इंडस्ट्री चेंबर सीआयआयच्या मते, 'भारतीय पर्यटन उद्योगाला सर्व भौगोलिक कार्यक्षेत्रांवर, अर्थात अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय, नुकसान करणारे हे संकट आजवरच्या सर्वात वाईट संकटांपैकी एक आहे. देशातील साधारण, साहसी, हेरिटेज, समुद्री, कॉर्पोरेट, इ. सर्वच पर्यटनाला याचा फटका बसला आहे आणि बसणार आहे. हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर, प्रसिद्ध ठिकाणे, रेस्टॉरंट्स, कौटुंबिक करमणूक स्थळे आणि हवाई, जमीन आणि समुद्र वाहतुकीची संपूर्ण व्हॅल्यू चेन कोलमडून पडली आहे.