India

व्हिडिओ: हिमांशु कुमार आणि रुपेश कुमार सिंग यांचा गुन्हा काय? मेड सिंपल । इंडी जर्नल

आदिवासींना 'प्रतिनिधित्व', आदिवासींसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक?

Credit : शुभम पाटील

गेल्या आठवड्याभरात देशात आदिवासींसोबत काम करणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात सरकारी यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेकडून कारवाई झाली. १७ जुलै रोजी मुक्त पत्रकार रुपेश कुमार सिंग यांना झारखंड पोलिसांनी अटक केली. दुसरीकडं दंतेवाडामधील आदिवासींबरोबर काम करणाऱ्या हिमांशू कुमार यांनी दाखल केलेली आदिवासींच्या हत्येच्या चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि उलट त्यांना ५ लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला! देशातील सर्वोच्च पदासाठी एकीकडं आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांचा विचार होत असताना, आदिवासींसोबत काम करणाऱ्या या दोघांना मिळालेली वर्तणूक, नक्कीच अनेक प्रश्न निर्माण करते. 

जाणून घेऊया या दोन्ही घटनांबाबत, इंडी जर्नल 'मेड सिंपल'मध्ये.

प्रस्तुती: प्राजक्ता जोशी । संशोधन, लेखन: प्रथमेश पाटील, प्राजक्ता जोशी । कॅमेरा: शुभम पाटील, प्रथमेश पाटील । एडिट: शुभम पाटील

 

 

इंडी जर्नलचे इतर रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.