India
लवकरच प्रकाशित होतंय ‘इंडियन अॅनिमल फार्म’ [इन फोकस: प्रवीण बांदेकर]
नामांकित लेखक प्रवीण बांदेकर यांची मुलाखत
प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला अलीकडेच महाराष्ट्र फाऊंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. बांदेकर इंग्रजीचे प्राध्यापक असून ते मराठीतले एक नामवंत लेखक आहेत. उजव्या सोंडेच्या बाहुल्या, चाळेगत या कादंबऱ्यांसह खेळखंडोबा ही दीर्घकविता, घुंगुरकाठी हा ललित लेख संग्रह हे त्यांचं आतापर्यंत प्रकाशित झालेलं महत्वाचं साहित्य.
कोकणातलं बदलतं सामाजिक पर्यावरण, माणसांमधलं तुटलेपण संवेदनशीलपणे चितारणारा हा लेखक आजच्या परिस्थितीत लेखकांवर असलेल्या भय - दहशतीला झुगारुन प्रसंगी त्याची किंमत मोजून लिहित राहणारा लेखक आहे. ‘इंडियन अॅनिमल फार्म’ ही बांदेकरांची नवीन कादंबरी मार्च अखेरीस शब्द पब्लिकेशनकडून प्रकाशित होणार आहे. यानिमित्तानं प्रवीण बांदेकर यांची मुलाखत.
इंडी व्हिज्युअल या आमच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.