India

व्हिडियो: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष, विचार माणसाला अधिक प्रगल्भ आणि बनवतो

लेखिका शिल्पा कांबळे यांची मुलाखत

Credit : NULL

शिल्पा कांबळे हे मराठी साहित्यातलं एक महत्वाचं नाव आहे. महानगरी आयुष्य जगताना आणि सर्व प्रकारची भौतिक प्रगती केल्यानंतरही महानगरांमध्ये लोकांना जातीय भेदभावाचे अनुभव येतात, हा भेदभाव करण्याचं स्वरूप बदललं आहे पण तो संपला मात्र नाही. या भेदभाव, कुचंबणा, विषमतेला सामोरं जाताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष, विचारांनी दिलेली प्रेरणा माणसाला अधिक प्रगल्भ आणि बनवतो. हा अंडरकरंट शिल्पाच्या यांच्या लेखनात दिसून येतो. 'निळ्या डोळ्यांची मुलगी' ही कादंबरी, बिर्याणी हे तिचं नाटक गाजलं. नऊ चाळीसची लोकल हा तिचा नुकताच प्रकाशित झालेला कथासंग्रह. याशिवाय स्टार प्रवाह वाहिनीवर मेपासून प्रसारित होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची संघर्षगाथा या मालिकेचं पटकथा लेखन त्यांनी केलं आहे. जात वर्ग स्त्री प्रश्नांना आजच्या दृष्टिकोनातून भिडणारी महत्वाची लेखिका म्हणून त्यांच्या लेखनप्रवासाबद्दल तिच्यासोबत केलेला हा संवाद.