India

पुरुष घरात बसलेत आणि महिलांना CAA विरोधात आंदोलनाला बसवलंय: योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं पुरुषी मानसिकतेतून विखारी भाषण

Credit : Patrika.com

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिश्त, ज्यांना 'योगी आदित्यनाथ' म्हणून ओळखलं जातं, हे त्यांच्या विखारी आणि भडकाऊ वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यातच त्यांनी आज कानपुर इथं केलेल्या भाषणात, 'शाहीन बाग सारख्या आंदोलनात महिलांना पुढं करून पुरुष घरी झोपा काढत आहेत," असं विखारी वक्तव्य केलं आहे. ते एका CAA समर्थनार्थ कार्यक्रमात बोलत होते. 

अजय बिश्त हे अनेक वर्षांपासून अशाप्रकारच्या चिथावणीखोर आणि शेलक्या शब्दात वक्तव्य करत आले आहेत. 'त्यांनी (मुस्लिमांनी) एक हिंदू मारला तर आम्ही त्यांचे शंभर मारू', ते पाहुणे असलेल्या एका कार्यक्रमात एका वक्त्यानंमी 'मुस्लिम महिलांची मृत शरीरं कबरीतून काढून त्यांच्यावर बलात्कार करू' अशी भयंकर वक्तव्य त्यांनी याआधी उत्तर प्रदेशचे आमदार असताना केली आहेत व अशा वक्तव्यांना पाठिंबा दिला आहे. त्यातच आता या वक्तव्याची भर पडली आहे. 

दिल्लीच्या शाहीन बाग मध्ये, सर्व धर्म-पंथाच्या अनेक महिला गेला महिनाभर धरना देत आहेत. त्या तिथं आंबेडकरांचे फोटो घेऊन, संविधान, अधिकार आणि स्वाभिमानाची गोष्ट करत आहेत. अनेक महिलांनी स्वतः अनेक प्रकारची आशयघन काव्यं आणि घोषणा लिहिल्या आहेत. महिनाभराहून जास्त काळात एकदाही या आंदोलनानं हिंसेला स्पर्शही केला नाही, त्याउलट अनेक समूहातील सामाजिक संघटनांनी या महिलांना मदत करत त्यांच्या संघर्षात आपला सहभाग नोंदवला आहे. 

त्यांचा प्रभाव पाहून देशभरात अनेक ठिकाणी 'हम भी शाहीन बाग' म्हणत अनेक महिला त्याप्रकारचा धरना देत आहेत. हा वाढत प्रभाव पाहूनच, सरकारमध्ये असलेल्या आणि CAA समर्थक असलेल्या पक्षांनी व राजकीय संघटनांनी या महिलांबद्दल अनेक अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. या आंदोलनाबाबत अनेक प्रकारची अश्लाघ्य वक्तव्यंदेखील केली जात आहेत आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं आजचं वक्तव्य त्याचंच द्योतक आहे. 

"हे आंदोलनाला आता आपल्या घरातल्या बायकांना चौका-चौकात बसवायला सुरुवात केली आहे. मुलांना बसवायला सुरु केलं आहे. किती मोठा अपराध आहे, की पुरुष घरात चादर घेऊन झोपा काढत आहेत आणि महिलांना चौका-चौकात बसवलं जात आहे.ज्यांना CAA काय आहे माहित नाही, ते धरना देत बसलेत आणि त्यांना विचारलं की का आंदोलन करत आहात तर सांगतात, घरातल्या 'मर्दाने' सांगितलं आहे की आम्ही काही करू शकणार नाही इतके निकामी झालो आहोत, तर तुम्ही जाऊन धरने द्या आम्ही घरी बसतो," असं वक्तव्य अजय बिश्त यांनी केलं.