India

आरेमध्ये रात्रीतून केलेल्या वृक्षतोडीनंतर जनक्षोभ, अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

सत्तेत असलेल्या शिवसेनेची 'सत्तेत आल्यावर झाडं तोडणाऱ्यांना शिक्षा देऊ' अशी भूमिका

Credit : indiatimes.com

मुंबई हायकोर्टाने मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोड करण्याची परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यात आली. शुक्रवारी म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने आरे मेट्रो कारशेड बाबतीतल्या सामान्य जनतेने आणि पर्यावरण प्रेमींनी दिलेल्या याचिका फेटाळून झाडे तोडण्यास परवानगी दिली. त्यानंतर संध्याकाळी ७.३० च्या सुमारास मेट्रो प्रशासनाने झाडे तोडण्यास सुरुवात झाली. पर्यावरण प्रेमींनी झाडे तोडण्यास विरोध केला.  

पर्यावरण प्रेमींनी केलेला विरोध आणि संताप बघुन पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले तसेच आरे परिसरात १४४ कलम लागु केला. सध्या हे प्रकरण सोशल मिडिया वर चांगलंच उफाळलं आहे. पोलिसांकडून होणारे अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, हत्या व्हिडिओत असेंहि आढळले आहे की माध्यमांना माहिती देणाऱ्या लोकांना पोलिस ताब्यात घेत आहेत. ह्या प्रकारणाचा विषय बघत राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड ह्यांनी सरकारवर हल्ला चढवत ट्विटरवर पोस्ट केली आहे. या व्हिडिओत त्यांनी सांगितले की मुंबईकरांनी आरेतील वृक्षतोडीविरोधात आवाज उठवायला हवा. पडणार प्रत्येक झाड आपला एक आमदार पडेल याची जाणीव सरकारला व्हायला हवी, असे त्यांनी म्हटलं आहे. "एकानं सांगितलं होतं आम्ही आरे कापणार, दुसऱ्यानं म्हटलं होत आरे कापू देणार नाही. मात्र ह्या दोघांनी मुंबईकरांना फसवलं. दोघंही काल एक झाले आणि आरेचं कारे, कारेच आरे झालं, आता आदेश आलाय. मात्र आता यावर कोणीच बोलत नाही," अशा पडखड शब्दात आव्हाड ह्यांनी भाजप-सेनेवर टिका केली.       

सध्या वरळीतुन विधानसभा लढवणारे नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध असल्याचं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आ'रेमधील जैवविविधता संपवण्याचा हा घाट लज्जास्पद आहे. अधिकारी ज्या तत्परतेने आरे कॉलनीतील र्वुक्ष तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं, म्हणजे झाडांची कत्तल करण्यापेक्षा पाकव्यात काश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवायला हवं' असं ट्वीट त्यांनी केलं. 'ज्यापद्धतीने आपण मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे,' असेही त्यांनी ट्विटरवर मांडले. मात्र आदित्य ठाकरे हे विसरलेला दिसत आहेत की त्यांचा पक्ष 'शिवसेना' हा मुंबई महानगरपालिका व राज्यात दोन्हीकडे सत्तेमध्ये आहे. 

आरे कॉलनी मध्ये ३५ प्रजातीच्या मुंग्या, सस्तन प्राण्यांच्या १९प्रजाती, पक्ष्यांच्या १३६ प्रजाती, सरपटणारे प्राणी ४७, फुलपाखरांच्या ८५, झाडे व झुडपे ३०० प्रजाती आरेच्या जंगलात आहेत. परंतु मेट्रो कारशेडमुळे सुमारे २७०२ झाडे तोडली जाणार आहेत. 'आरेचा मुद्दा हा सर्वात महत्त्वाचा मुद्धा आहे. सध्या आरे कॉलनीत जे काही सुरू आहे त्याची मी सविस्तर माहिती घेईन,' असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. आरे कॉलनीतल्या झाडांची कत्तल करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'आगामी सरकार हे आमचंच असेल आणि ज्या लोकांनी झाडांची कत्तल केली आहे त्यांना शिक्षा दिली जाईल,' असं त्यांनी म्हटलं. मात्र जर शिवसेनेची सत्ता अजून आली नसेल तर आत्ता सत्तेत कोण आहे?' असा आश्चर्यमिश्रित लोकांनी विचारल्यास वावगं ठरणार नाही. 

"आरे कॉलनीतील वृक्षतोडीबाबत सरकार अहंकारी भूमिका घेत आहे. एकीकडे वातावरण बदलाच्या गप्पा मारायच्या व दुसरीकडे रात्रीच्या अंधारात गुपचूप वृक्षतोड करायची हे योग्य नाही. अहंकार बाजूला ठेवून मुंबईचं हे फुफ्फुस वाचविण्यासाठी तुम्ही पुढे येणं अपेक्षित होतं," असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.