नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील निवडणुकांत तेलंगणा वगळता काँग्रेसचा बोऱ्या वाजला असला, तरीदेखील शहरातील आणि ग्रामीण भागातील तरुण वर्ग, शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक तसेच महिला यांना आकर्षित करून घेता येईल, असा कार्यक्रम काँग्रेसने तयार केला पाहिजे. देशातील सर्व जाती धर्मांतील पिचलेल्या वर्गाच्या दुःखांना काँग्रेसने वाचा फोडली पाहिजे.