Americas
जंगलतोडी विरोधात कॅनडाच्या २५ वर्षीय तरुणांचे उपोषण
कॅनडातील नोव्हा स्कॉटीया येथे सुरू असलेल्या बेकायदा वृक्षतोडी विरोधात ते उपोषण करत आहेत.
कॅनडातील नोव्हा स्कॉटीया येथे सुरू असलेल्या बेकायदा वृक्षतोडी विरोधात २५ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ते जेकब फिलमोर विधानसभेच्या मुख्यालयाबाहेर फक्त पेज आणि पाण्यावर उपोषण करत आहेत. जनजागृती करणाऱ्या नेचर नोव्हा स्कॉटीया या संस्थेच्या म्हणण्यानुसार, नोव्हा स्कॉटीयाच्या अर्ध्या जंगलांत मागील ३५ वर्षांपासून वृक्षतोड होत आहे. यासंदर्भात फिलमोर यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
फिलमोर यांनी या पत्रकात म्हटले आहे की, "काही महिन्यांपूर्वी, स्थानिक सरकारने पर्यावरणाच्या प्रश्नांवर कारवाई न केल्याने मी कंटाळलो होतो. सरकार स्थानिक उद्याने विकत होते आणि याला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना सरकार अटक करीत होते," असे सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटले आहे.
Jacob Fillmore: “The forests need protection now” https://t.co/Bno3svCVNp #nspoli
— Nova Scotia Advocate (@ns_advocate) March 18, 2021
"गेल्या आठवड्यात लोकांनी मला सांगितले आहे की, माझा संदेश पोचवण्याचा उपोषण हा एक शेवटचा मार्ग असून आता अंतिम उपाययोजना करण्याची वेळ आली आहे," असे या कार्यकर्त्याने म्हटले आहे.
फिलमोर म्हणाले, "आम्ही पर्यावरणाच्या संकटाला तोंड देत आहोत. खुद्द प्रांतिक सरकारही याबाबतीत बरेच काही बोलले आहे. त्यांनी जे बोलले आहेत तशी कृती करावी, अशी माझी मागणी आहे. आता कारवाई करण्याची गरज आहे." स्थानिक अधिकारी जैवविविधता कायदा लागू करण्याची तयारी जरी दाखवत असले तरी ती ऑक्टोबरपर्यंत लागू होणार नाही. सरकार वीजनिर्मितीसाठी लाकडाचा वापर करत असल्याने पर्यावरणवादी गटांमध्ये चिंता वाढली आहे.