Asia

माझ्या देशाला तातडीच्या आंतरराष्ट्रीय मदतीची गरज आहे, म्यानमारच्या सौंदर्यवतीचं सैनिकी सरकारविरोधात आवाहन

एक फेब्रुवारी रोजी लष्कराने बंड करून सत्ता ताब्यात घेतली होती.

Credit : Sources

"आज माझ्या देशात, म्यानमारमध्ये बरीच माणसे मरत आहेत," हॅन ले ही मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२० ठरलेली सौंदर्यवती थायलंडमधील कार्यक्रमात म्हणाली. "कृपया म्यानमारला मदत करा. आम्हला आत्ता आपल्या तातडीच्या आंतरराष्ट्रीय मदतीची आवश्यकता आहे."

म्यानमारमध्ये सैन्यानं उठाव केल्यानंतर सैनिकी जंता सरकार सत्ता चालवत आहे. तिथल्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या आंग सान स्यू की बहुमताने निवडून आल्यानंतर म्यानमारमध्ये दीर्घ काळ एकहाती सत्ता ठेवणाऱ्या लष्कराने विरोधकांना पाठिंबा देऊन निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. निवडणुकीतील गैरप्रकाराच्या आरोपांना पुरावे नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला होता. मात्र, म्यानमारमध्ये पुन्हा लष्करशाही आलीच. एक फेब्रुवारी रोजी लष्कराने बंड करून सत्ता ताब्यात घेतली होती.

म्यानमारमध्ये लष्कराच्या या दमननीतीला नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. सुरुवातीला फारसा प्रतिकार न करणाऱ्या लष्कराने आता थेट उघड दडपशाही आणि हिंसाचार सुरु केला आहे. निषेध करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले, तेव्हा सैन्याने त्यांना थांबविण्यासाठी वॉटर कॅननचा वापर केला. एका आठवड्यानंतर, प्रतिसाद रबरच्या गोळ्यांपर्यंत वाढला आणि नंतर थेट बंदुका आणि हवाई हल्ल्यांचा वापर आता सैन्यानं स्वतःच्याच जनतेविरुध्द्व सुरु केला आहे. म्यानमारमध्ये शनिवारी २७ मार्च 'ऑर्म्ड फोर्सेस डे' च्या दिवशी लष्कर आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. शनिवारी संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, लष्कराच्या गोळीबारात १०० हून अधिक आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर आधीही आंदोलनात साम्भाग घेतलेली हॅन ले ही मिस ग्रँड आंतरराष्ट्रीय स्पर्धा कार्य्रमादरम्यान दिलेल्या तिच्या भाषणात तिच्या देशवासियांच्या मदतीसाठी, अन्य देशांना विनंती करू लागली.

"निष्पाप मुलं, तरुण आणि नागरिक आपला जीव धोक्यात घालून का लढत आहेत? जर ही परिस्थिती इतर कुठं उद्भवली तर जगभरातील लोक तोडगा काढण्यासाठी आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. आज, माझ्या देशात, म्यानमारमध्ये, मी इथं भाषण करत असताना, बरेच लोक मरण पावले आहेत. आज १०० पेक्षा जास्त लोक मरण पावले. ज्यांनी आपला जीव गमावला त्या सर्वांसाठी मी मनापासून सहवेदना व्यक्त करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावरुन माझे शब्द बोलण्याची मला मोठी संधी मिळाल्याबद्दल मिस ग्रँड आंतरराष्ट्रीय संस्थेचे मनापासून आभार. मला येथून म्हणायचे आहे की कृपया म्यानमारला मदत करा. आम्हाला आत्ता आपल्या तातडीच्या आंतरराष्ट्रीय मदतीची आवश्यकता आहे," असं म्हणत हॅन ले हिनं पाश्चिमात्य लोकशाहीवादी देशांनी म्यानमारमधल्या परिस्थतीत हस्तक्षेप करावा असं आवाहन केलं.