Opinion
आज रात्री ९ मिनिटांचा मागणीतील चढ-उतार संपूर्ण विद्युत यंत्रणेला धोक्यात आणू शकतो
मोदींच्या ९ मिनिटांच्या पीआर इव्हेंटचा विद्युत उपकरणांवरील परिणाम
-तेजल कानिटकर
रविवारी रात्री होणारी ब्लॅकआउट रोखण्यासाठी पॉवर ग्रिड ऑपरेटर मोठ्या प्रमाणात भार आणि उतार-चढ़ाव सांभाळून घेण्यासाठी तणावात आहेत.
३ एप्रिल रोजी ९ मिनिटांच्या व्हिडिओ मेसेजद्वारे पंतप्रधानांनी भारतीय नागरिकांना रविवार ५ एप्रिल रोजी, देशभरात रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद ठेवण्यास सांगितले आणि त्याऐवजी तेलाचे दिवे, मेणबत्त्या, किंवा मोबाइल फ्लॅशलाइट्स तेवत ठेवण्यास सांगितले. लॉक डाऊन आणि सोशल डिस्टंसिन्गवेळी मनोबल वाढविण्यासाठी ९ मिनिटांचा हा सामुदायिक-विधी पंतप्रधानांनी प्रस्तावित केला आहे. मात्र, ही घोषणा झाल्यानंतर, पॉवर ग्रीड ऑपरेटर अचानक कोव्हिड-१९च्या विरोधात लढा देत डॉक्टरांसह पहिल्या रांगेत लढणारे कामगार बनले. ते कसं?
तर प्रकाशयोजनाशी संबंधित विद्युत भार स्वतंत्रपणे मोजले जात नाही, परंतु त्याचा अंदाज लावता येतो. या घटनेत भाग घेणारी एकूण कुटुंबे आणि ते सहसा वापरत असलेल्या प्रकाशयोजनांचे प्रमाण अचानक बंद करून आणि ९ मिनिटांत पुन्हा वापरल्याने गृहितकांच्या आधारे, ग्रीडमध्ये १०,००० ते २०,००० मेगावॅट दरम्यान घसरण दिसून येईल असा अंदाज आहे. याअंदाजाद्वारे वापरल्या गेलेल्या गृहितकांची माहिती तक्ता १ मध्ये दर्शविली आहे.
तक्ता १. अखिल भारतीय लाइटिंग लोड अंदाज
घरांची संख्या | २१,३०,३६,४५३ | स्त्रोत: सौभाग्य योजना डॅशबोर्ड https://saubhagya.gov.in/ |
विद्युतीकृत नसलेल्या घरांची संख्या | १८,७३४ | स्त्रोत: सौभाग्य योजना डॅशबोर्ड https://saubhagya.gov.in/ |
विद्युतीकृत कुटुंबांची संख्या | २१,३०,१७,७१९ | स्त्रोत: सौभाग्य योजना डॅशबोर्ड https://saubhagya.gov.in/ |
दिवे बंद करणाऱ्या कुटुंबांची संख्या | १७,०४,१४,१७५ | ८०% कुटुंब ९ मिनिटांच्या कार्यक्रमात भाग घेतील असे गृहीत धरल्यास. |
सकाळी 9 वाजता बंद होईल अशी एकूण इन्स्टंटॅनियस लोड [मेगावॅट] (पुराणमतवादी अंदाज) | १०,२२५ | गृहित धरले की प्रत्येक घरामध्ये सरासरी ६० वॅट्स बंद असतील: तीन २० वॅटच्या सीएफएलच्या बरोबरीने |
सकाळी 9 वाजता बंद होईल अशी एकूण इन्स्टंटॅनियस लोड [मेगावॅट] (उच्च अंदाज) | २०,४५० | असे गृहित धरले की प्रत्येक घरातील सरासरी १२० वॅट्स बंद असतील: चार २० वॅटच्या सीएफएल आणि ४० वॅटच्या टेलिव्हिजन. |
पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (पोसोको) ग्रीडवरील लोडसाठी दररोज अहवाल प्रदान करते (जे आता राष्ट्रीय ग्रीड आहे). ४ एप्रिल, २०२० पासून पोसोकोने प्रसारित केलेल्या दैनिक अहवालावर आधारित संपूर्ण भारतासाठी अंदाज तयार केला आहे. जर ९ वाजता मीटरमध्ये २०,००० मेगावॅटच्या भाराची घसरण (कारण कमी घसरणीपेक्षा जास्तीच्या घसरणीसाठी तयार रहाणे कधीही श्रेयस्कर) आपणास बघायला मिळाली तर त्वरित उद्भवणारा एक लक्षणीय चढउतार लोडमीटर वर दिसेल. हे खालील आकृतीमध्ये पाहिले जाऊ शकते.
ग्रीडमध्ये उद्भवणारे चढ-उतार व पुरवठा आणि मागणी या दोन्ही हाताळण्यासाठी यंत्रणा असली तरी, हे चढ-उतार सामान्यत: अर्ध्या तासाच्या आसपास कालावधीत घडत असतात. मात्र अचानक फक्त ९ मिनिटांमध्ये हे चढ-उतार सांभाळणे हे एक आव्हान असणार आहे. अशा चढ-उतारांचे विपरीत परिणाम होऊ शकतात, विशेषत: जर ते बदल एखाद्या मोठ्या भूभागात केंद्रित झाले असतील (उदाहरणार्थ मोठ्या शहरात). याचेही उदाहरण द्यायचे झाल्यास, एखाद्या विशिष्ट स्थानावरून अचानक ग्रीडमधून मोठ्या प्रमाणात लोड गायब झाल्यास, इतर क्षेत्रांमध्ये विजेचा भार वाढेल, ज्यामुळे लाइन ट्रिप होतील, ज्यामुळे व्होल्टेज अस्थिरता उद्भवेल.
जर हे नियंत्रणाबाहेर घडले आणि अनेक व मोठ्या ठिकाणी घडले, तर कदाचित ब्लॅकआउट होऊ शकतो. अशा परिस्थितीत जेव्हा रुग्णालयात नॉन-स्टॉप कार्य सुरु असणे आवश्यक असते, पाणीपुरवठा, स्वच्छता इत्यादीसारख्या इतर अत्यावश्यक सेवांचा पुरवठा कायम असणे गरजेचे असते, अशा ठिकाणी ब्लॅकआउटची कल्पना करणे देखील भयानक आहे. आम्ही आशावादी आहोत की पॉस्को तसेच राज्य उपयोगितांमध्ये पॉवर सिस्टम अभियंते हे व्यवस्थापन करण्यासाठी धोरण आखतील. उदाहरणार्थ, या घटनेच्या व्यवस्थापनासाठी spinning reserves, जल-विद्युत आणि स्टेज लोड-शेडिंगचा वापर करण्याची सोय आधीपासूनच केलेली आहे
वरील आकृती सकाळी ९ वाजेपासून सुरु होऊन रात्री ९ पर्यंत चालणाऱ्या पीक लोडचे लोड-शेडिंग दर एकरेषीय स्वरूपात दर्शवते आणि त्यानंतरही अशाच प्रकारे घसरण दिसून येते. यात दर तासाला सुमारे १.८ गिगावॅट लोडशेड घडतो. (आकृतीमध्ये रेषात्मक कल आहे. देशभरात आवश्यक असलेल्या लोडशेडिंगची गरज कमी असेल.) तरीही, रॅम्पिंगचा दर व लोडशेडिंगचा दर सांभाळत राहणे ही वीज पुरवठादारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. बऱ्याच प्रांतांमध्ये घरगुती व व्यावसायिक वीजपुरवठा स्वतंत्र नसतो, अशात स्थानिक लोडशेडिंगमुळे काही भागातील अत्यावश्यक सुविधा (अगदी रुग्णालयेही) पर्यंत वीज खंडित होऊ शकते.
वीजपुरवठ्यात वाढीचे उच्च दर नियंत्रित करण्यासाठी स्वस्त असणारे औष्णिक विद्युत जनित्र किमान भारांवर तात्पुरते चालवावे लागतील आणि जलविद्युत आणि नैसर्गिक वायू (Natural Gas) वर चालणारी जनित्रं वापरावी लागतील. यामुळे खर्चातही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
यानंतरही, आपल्या समोरचा प्रश्न मात्र कायम राहतो आणि तो म्हणजे, कोव्हिड-१९ च्या विरोधातील लढाईमध्ये कसलीही मदत होणार नाही अशा कार्यक्रमासाठी एका अख्ख्या महत्त्वाच्या व्यवस्थेला कोसळण्याच्या स्थितीमध्ये टाकणे गरजेचे आहे का? लोकांचे प्राण कसे वाचविले जात आहेत आणि कामगारांना ऍन कसे उपलब्ध करून दिले जात आहे याविषयी माहिती देऊनही लोकांचे मनोबल वाढविले जाऊ शकते. आपल्या समोर एवढी आव्हाने असतांना दिवे आणि मेणबत्त्या पेटवत यंत्रणेवर व्यवस्थापनाचा बोजा आणणं कुठल्याही तर्कात बसत नाही.
लेखिका एनर्जी एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम, स्कुल ऑफ नॅच्युरल सायन्सेस अँड इंजिनियरिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीज, बेंगळुरूशी संलग्न आहेत.
हा लेख newsclick.in वर प्रथम प्रकाशित. अनुवाद: हितेश पोतदार