Quick Reads
मानसिक आजार आणि मातृत्व
मानसिक आजाराने त्रस्त महिलांच्या मातृत्वातील अडचणी
- अमोल गुत्ते
दिवसेंदिवस वाढणाऱ्या असंख्य मानसिक आजारांमध्ये एक गंभीर स्वरूपाचा आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया होय. यालाच आपण मनोविदलता असेदेखील म्हणू शकतो. नेहमी भ्रमात राहणे, स्वतःशीच सतत बोलणे, अस्वस्थ विचारप्रक्रिया असणे, आक्रमक होणे, आत्ममग्न राहणे ही अशी असंख्य स्किझोफ्रेनिया आजाराचे लक्षण आहे. या आजाराची मानसिक आघात, भावनिक असंतुलन, तीव्र संवेदनशीलता, ही, किंवा अशी अनेक कारणे असतात.
१९९८ला डब्ल्यूएचओ ने स्त्रीची मानसिक स्थिती तिच्या समाजातल्या असलेल्या स्थानाशी निगडित केली आहे. भारतात नेहमी दुय्यमच राहिलेले आहे. त्यामुळेच मानसिक किंवा स्किझोफ्रेनिया या आजारामुळे घर सोडणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. आत्ममग्न असलेल्या महिलांवर होणारे बलात्कार आणि त्यातून जन्माला आलेली मुलं, पर्यायाने त्यांचे भवितव्य हादेखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
खरे तर स्किझोफ्रेनिक महिलांच्या आजाराच्या तीव्रतेवर त्यांचा दैनंदिन जीवनाच्या बाबी अवलंबून असतात. एखादी सर्वसाधारण स्त्री बाळंतपणाच्या वेळी स्वतःमधील हार्मोन्सचे संतुलन गमावून बसते आणि त्या मानसिक धक्क्यातून ती बाहेरच येत नसल्याचे समजते. यालाच आपण बाळंतपणाचे आजार असेही म्हणत असतो. 'नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन 'नुसार महिलांचे गर्भातील बाळावर विशेष लक्ष देणे गरजेचे ठरते.
कमी वजनाचे, अशक्त आणि शारीरिक व्याधी असलेले बाळ जन्माला येताना दिसतात. कोणत्याही बाळाला त्याच्या शारीरिक आणि मानसिक संगोपनाची आवश्यकता असते. इतर मातांप्रमाणे स्किझोफ्रेनिक मातांच्या बाळाच्या संगोपनात मूलभूत फरक आढळतो. सीमन आणि कोहेन हे कॅनडातील तज्ज्ञ स्किझोफ्रेनिक महिला संदर्भात असं म्हणतात कि या महिलांच्या गर्भधारणेच्या नंतर प्रसूती पर्यंत सर्व सोयी एकाच छताखाली मिळणे गरजेचे आहे. त्यांनी स्वतःचे आणि भविष्यातील मुलांचे आरोग्य जपण्यासाठी विशेष औषधोपचार घेण्याची गरज आहे. तसेच अशा स्त्रियांच्या गर्भाला धोका असतो. कमी वजनाचे, मुदतीपूर्वी प्रसूती, अकाली मृत्यु असे अनेक धोके असतात. सर्वात जास्त धोका हा गर्भधारणेनंतर चार ते दहा आठवड्यांमध्ये असतो.'
सर्वप्रथम आपण जन्माला घातलेलं मूल हे आपलं मूल आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आपल्या लहान मुलाला दूध पाजण्याची गरज आहे हेसुद्धा त्यांना समजत नाही. आजार जर खोलवर पसरलेला असेल तर या महिला आक्रमक होऊन स्वतःच्या बाळाला शारीरिक इजा देखील पोहोचवतात. अहमदनगर येथील डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्या माऊली सेवा प्रतिष्ठान मध्ये घडलेला एक प्रसंग त्यांनी मला सांगितला.
बलात्कार पीडित एक स्किझोफ्रेनिक महिला गरोदर होऊन त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झाली. तिचे मूल जन्माला आल्यानंतर ते तिच्या मांडीवर ठेवल जायचे. आत्मभान हरवल्या कारणानं आणि भूतकाळातील मानसिक आघातामुळे तिची आक्रमकता वाढायची आणि स्वतःच्या बाळाला एखाद्या बाहुलीसारखी ती भिंतीवर फेकून द्यायची" याचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा 0 ते 3 वयोगटातील सुदृढ बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वाची पायरी पार करण्यास मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होऊ शकेल !भावनिक उत्तेजन कमी मिळाल्यामुळे मानसिक आणि पर्यायाने शारीरिक वाढीवर त्याचा अत्यंत गंभीर परिणाम होतो .
जगण्याची संधी मिळणे हा कोणत्याही बाळाचा मूलभूत अधिकार आहे. एकीकडे वडील नाहीत आणि आई मनोविदलते मध्ये अडकलेली आहे, अशावेळी येणारा एकटेपणा अत्यंत अवघड ठरतो आणि त्याचा त्या बाळाच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होतो. आपल्या कामातील थोडासा वेळ काढून स्वयंसेवक या भुमीकडे न जाता सामाजिक पालकत्वाचा विचार आपण जर केला तर या लहानग्यांना जवळ घेऊन, बोलून, सदैव संपर्कात राहून जर मानसिक उत्तेजना पण देऊ शकतो.
त्यामुळे ० ते ३ या वयोगटातील बाळांचा विकास होऊ शकेल आणि पर्यायाने सुदृढ आयुष्य जगण्यास ते सक्षम होवू शकतील. १९८४ ला SCARF नावाची संघटना चेन्नईमध्ये स्क्रिझोफेनिया आजाराच्या उपचारासाठी सुरू झाली. अशा अनेक संघटना प्रत्येक जिल्ह्यात सुरू व्हायला हव्यात. सक्षम समाजाच्या सक्षम वाटचालीसाठी आपण प्रयत्न करूयात ही अपेक्षा!
अमोल गुत्ते युनिसेफ फेलो आहेत.