घाटकोपरच्या रमाबाई नगरला लागून सिद्धार्थ नगर, कामराजनगर, रमाबाई कॉलनी, फुले नगर, यशोधरानगर, हर्षवर्धननगर, कामराजनगर, कन्नमवार नगर, आंबेडकरनगर, गौतमनगर, भीमनगर, भीमवाडी, लुम्बिनी बाग, गायकवाड चौक, ट्रान्सीट कॅम्प, पांजरपोळ, राहुलनगर, सगळ्या सिग्नल च्या आजूबाजूला असलेल्या वस्त्या, महाराष्ट्रनगर, मंडाला, भारतनगर अश्या सगळ्या वस्त्या एका ला एक लागून आहेत. इंतझार हुसेन ने लिहलेली वस्ती आणि वसंत मून ने लिहलेली वस्ती; थोड्या फार प्रमाणात मेळ खाते पण या वस्त्या आता शांघाई बनण्याच्या आडे येत आहेत.