Quick Reads
माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: अर्विन श्रोडिंगर
अर्विनच्या संशोधनापेक्षा त्याचा वैयक्तिक प्रवास विलक्षण होता
M.sc ला असताना एका माणसानं डोक्यात तांडव सुरु केलेलं. कसै ना, काही वेळा काही लोकांना टाळायचं तर असतं पण त्यांच्याविना आयुष्य पुढं सरकतही नव्हतं. त्यात आमचा कळमु मास्तर या तांडवदेवाचे गुणगान संपवतच नव्हता. म्हणतात ना लोहा लोहे को काटता है, तसंच म्हणलं आता याला कटवायचं तर भिडायलाच पाहिजे. तो असेल तगडा पहिलवान पण आम्ही पण काय कमी नव्हतो. बॅटलफिल्ड म्हणून निवडलं कॉलेजचं गार्डन आणि चार जण आम्ही सज्ज झालो हत्यारं घेऊन. पण जसजशी लढाई लढत होतो, साला आमचा व्हिलन भुरळास्त्रच घालत होता आमच्यावर. सरतेशेवटी प्रेमात पडलो धारातीर्थी पडण्याऐवजी.
तो तांडव देव कोण ते सांगायचंच राहिलं नाही का? तो होता श्रोडिंगर आणि आम्ही अभ्यासत होतो श्रोडिंगर समीकरणं. तोच तो फेमस मांजरीवाला. जगात जर फिजिक्समध्ये योगदान देणारे कोणते अग्रगण्य देश असतील तर ते आहे जर्मनी आणि ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रियातील व्हिएन्नामध्येच रुडॉल्फ श्रोडिंगर जे वनस्पतिशास्त्रज्ञ होते आणि जॉर्जिन एमिलिया ब्रेन्डा श्रोडिंगर यांच्यापोटीच १२ ऑगस्ट १८८७ ला जन्मलेला हा त्यात आई अँग्लो-ऑस्ट्रियन आणि वडिल कॅथोलिक होते आणि हा नास्तिक. म्हणजे धन्यच. शालेय जीवन तर त्याने हुशारीतच घालवलं यात शंकेला जागाच नाही. महाविद्यालयीन जीवन मात्र याचं सुपरडुपर होतं. म्हणजे तिथंच चार वर्षे, १९०६ आणि १९१० च्या दरम्यान याने व्हिएन्नामध्ये फ्रांत्स एस.एक्नेर आणि फ्रेडरिक हसनोहरल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गोष्टी अभ्यासल्या. याच अभ्यासाच्या जोरावर १९११ मध्ये, श्रोडुला एक्नेरने आपला सहाय्यक बनवलं. एवढ्या लहान वयातच श्रोडु सगळ्यांनाच प्रभावित करत होता.
१९१४ मध्ये त्याने हॅबिलिटेशन ही व्हिएन्नामधील सर्वोत्कृष्ट मानली जाणारी पदवी प्राप्त केली. पण नंतर लगेचंच त्याला ऑस्ट्रियन किल्ला तोफखाना विभागात युद्ध अधिकारी म्हणून युद्ध कार्य करायला जाणं भाग पडलं. तिथुन परत आल्यावर जेना येथे मॅक्स वियन यांना सहायक म्हणून काम केले आणि सप्टेंबर १९२० मध्ये त्यांनी एओ पद मिळविले. १९२१ ला लगेचंच प्राध्यापकही झाला तो.
त्याच दरम्यान त्याच्या आयुष्यात एक सुंदर समिकरण आलं. ॲनी बर्टेल. ६ एप्रिल १९२०ला लग्नाच्या बेडीत अडकला. म्हणतात ना, सुख दुःख बेस्ट फ्रेंडसारखे असतात. त्याला क्षयरोग झाला आणि तो अरोसा येथे एक सॅनेटोरियम ला राहु लागला. या काळात मात्र त्याच्याकडे वेळच वेळ होता आणि तो त्याने सत्कारणीही लावला. Wave equation तिथलीच देण.
हार्डकोअर भौतिकशास्त्रज्ञ कदाचित झुरीकपासुन दुर राहु शकत नसावा. जिथं अल्बुही अपवाद नाही तिथं श्रोडु कसा असेल? श्रोडु गेलाच झुरीकला. तिथल्याच विद्यापीठात स्थाईकही झाला. आता झुरीक झालांय म्हणल्यावर जर्मनीही आलीच पाठोपाठ. बर्लिनमधील फ्रेडरिक विल्हेल्म युनिव्हर्सिटीत मॅक्स प्लॅंक वरती काम करण्यासाठी त्यानं जर्मनी गाठलीही. अलबर्टचा रुट वगैरे फॉलो करत होता की काय, काय माहित. खरंतर जर्मनी त्याला आवडली होती. पण जर्मनीला तो आवडला नसावा. १९३४ मध्ये नाझीवाद उफाळुन आलेला आणि तेवढ्यासाठी त्यानं जर्मनी सोडायचं ठरवलं. पण त्याचं काम सुरुच होतं. ऑक्सफर्ड विद्यापीठात तो मॅग्डालेन कॉलेजचे फेलो म्हणून काम करायला लागलां. हे एका अर्थानं बरंच झालं म्हणायचं. कारण यानं जर्मनी सोडली नसती तर कदाचित पॉलबाबाशी भेट झालीच नसती. आणि अर्थात नोबल पारितोषिकही जे जर्मनीवारुन आल्या आल्या याच्या पदरी पडलं.
होय, पण बाकी जर्मनीसारखं ऑक्सफर्ड काय त्याला आवडलं नाही. घरही चांगलं नव्हतं आणि दोन बायकांसोबत कपाट शेअर करण अवघडच असतं नाही का? साला याचं आयुष्य ना माझ्यासारखंय. हवं ते लगेच समोर कसं येतं कळत नाही? सोलमेट वगैरे होतो की काय, काय माहित. तो प्रिन्सटन विद्यापीठात भाषण देतो काय आणि त्याला तेथे कायमची जागा मिळते काय. सगळंच अजब नाही का? पण याहुन अजब म्हणजे त्यानं तो प्रस्ताव स्वीकारलाच नाही.कारण कायतर तर श्रोडुला त्याच्या बायकोसौबत रहायचं होतं आणि मालकीणीला नको होतं. मग एडिनबर्ग विद्यापीठात त्याला पदवीची आशा होती परंतु व्हिसा लांबला आणि शेवटी त्याने १९३६ मध्ये ऑस्ट्रियातील ग्रॅझ विद्यापीठात पदवी घेतली. मग आमचं येडुलं खुश झालं कारण त्याला भारतातील इलाहाबाद विद्यापीठाकडुन आमत्रंण आलं.
१९३५ मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यासोबत व्यापक पत्राचारानंतर या कार्यकालच्या काळात त्यानं परत काम पुढं नेलं. तिथुन तो १९३८ साली त्यांनी आयर्लंडला गेला. तेव्हा मात्र वेगळंच समीकरण बिचाऱ्या ॲनीसाठी तयार झालं होतं.आर्यलँडचा व्हिसा नवराबायकोसाठी नव्हता तर आणखी एकीसाठीही होता. आणि ती होती त्याच्या ऑस्ट्रियन सहकार्याची पत्नी मार्च होती. तिच्यापासुन श्रोडुला मुलगीही झाली होती. एवढ्यावरही ही समीकरण संपलं असतं तर बरं होतं पण श्रोडुला आणखीही दोन वेगवेगळ्या बायकांपासुन मुलं होती.
यानंतर मात्र त्याला नाही म्हणलं तरी बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं. तो नास्तिक आणि धर्माचा पगडा नसलेला माणुस होता त्यात उफाळत्या नाझीवादाविरुद्ध बोलल्यानं त्याला ग्रॕझ विद्यापीठानआ राजकीय अविश्वासनीयतेमुळं काढुन टाकलं. जरी देश सोडायचा आदेश सरकारनं दिला नसला तरी त्याचा जीव प्रचंड गुदमरत होता. मानसिक छळानं पुरता ग्रासला गेलेला. शेवटी त्याला बायकोसोबत देशातुन पळून इटलीला जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.
इथुन पुढं मात्र ऑक्सफर्डला परत जाणं झालं आणि चांगले दिवस आले म्हणायला हरकत नाही. आयर्लंडमधल्या डब्लिनमध्ये एका शाळेत सैद्धांतिक भौतिकशास्त्रासाठी शाळेचे संचालक म्हणून जवाळपास १७ वर्षे काम पाहिलं. तिथंच युनिफाइड फील्ड थिअरीच्या त्याच्या शोधांसह सुमारे ५० च्या वर पेपर पब्लिश केले. जागतिक ऊर्जा परिषदेदरम्यान एका महत्त्वाच्या व्याख्यानात त्यांनी त्याच्या संशयास्पदतेमुळे परमाणु उर्जेवर बोलण्यास नकार दिला आणि त्याऐवजी दार्शनिक व्याख्याने दिली. या काळात श्रोडिंगर मुख्य प्रवाहात क्वांटम मेकॅनिक्सच्या 'वेव्ह-कणांच्या' या dual nature कल्पनेचा प्रचार केला यामुळे बरेच विवादही झाले.
दरम्यानच त्याचा क्षयरोग नव्यानं बळावला आणि ४ जानेवारी १९६१ रोजी, श्रौडु ७३ वर्षांचा असताना क्षय रोगाने त्याचे निधन झाले. बिचारी ऍनी आधीच खुप काही सहन करत होती, आता पुरती एकटी पडली. चारच वर्षाने तीही त्याच्या पाठोपाठ निघुनही गेली.