Quick Reads
माझं (शेवटचं) विज्ञानवादी प्रेमप्रकरण: लिसा रँडल
लिसा रँडल सद्यकालीन विज्ञानाच्या सुपरस्टार्सपैकी आहे
प्रत्येकाच्या आयुष्यात एक कुणीतर बेक्कार भारी क्रश असतो. म्हणजे फक्त विरुद्धलिंगी नाही तर समलिंगीही. कित्येक बायका स्मिता पाटीलच्या प्रेमात आहेत तर काही जणी माधुरीवर जीव ओवाळुन टाकतात. कुणाला तरी शिल्पा शेट्टी व्हायचंय तर कुणाला विद्या बालन.
मला ना कौण व्हायचंय माहितेय का? एक अफाट हॉट्ट पोरीबद्दल माझा नवरा काहीतरी वाचत होता. म्हणलं कोणय ती बघु? दाखवलं त्यानं. बघितलं आणि लागलीच बोलले,
"सवतै तुझी,लांब राहायचं काय?"
अहो,खरोखर फ्लॕट झाले मी तिच्यावर. सैप्योसेक्शुअल प्रकार तर जागृत झालाच पण तिचा तो भयानक हॉटनेस बघुन तर घायळच. तिचं रुप जितकं कातील तितकंच तिचं डोकं शातिर. अर्थात ती काय कुठली अभिनेत्री नाही तर नायिका आहे. सध्या तरी माझी प्रेरणा. भविष्यात मला तर बुवा तिच्यासारखंच एक हॉट्ट आणि हुश्शार physicist व्हायला आवडेल. खरंतर मी तेच बनणार असा काहीसा पणच केलाय मी तरी.
कोणै बरं ती चैन चुराया मेरा जिसने वो सनम??
लिसा रँडल
भौतिकशास्त्रज्ञ (हे तर मी पण होणारै), हार्वर्ड विद्यापीठाची आण बान शान (तात्पुरतं सोलापुर विद्यापीठावर ट्राय करते हं ) ; लेखिका (मी तरी या मार्गावर आहे).
न्यूयॉर्क शहरात जन्मलेली, स्टुयवेसेंट हायस्कूल १९८०पासून पदवीधर झालेली आणि आज भौतिकशास्त्रज्ञ असणारी ती विज्ञानात लोकप्रिय असाणाऱ्या ब्रायन ग्रीनची क्लासमेट होती. वयाच्या फक्त १८ व्या वर्षी १९८० च्या वेस्टिंगहाउस सायन्स टॅलेंट सर्चमध्ये पहिली आलेली ती. त्यानंतर तिने हार्वर्ड विद्यापीठातुन भौतिकशास्त्रातील बीए केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर तिने हॉवर्ड जॉर्जी यांच्या गायडन्सखाली सैद्धांतिक कण भौतिकीमधील पीएचडीसाठी अर्ज केला.आजही ती हार्वर्ड विद्यापीठा सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतेय आणि संशोधनही. तिच्या संशोधनामध्ये elementary particles आणि fundamental समावेश आहे. तसेच अनेक फिल्डमध्येही तिचं काम अगदी चोख आहे.supersymmetry,Standard Model observables,cosmological inflation,baryo genesis,grand unified theories, andgeneral relativity ही अशी ज्याःची नावंही सामान्य माणुस जपुन घेतो त्यात ती रोज नवनविन डोकं चालवत असते.
खरंतर हार्वर्ड येथे पदवीधर झाल्यानंतर, लिसा २००१ मध्ये हार्वर्डला परत येण्याआधी एमआयटी आणि प्रिन्स्टन विद्यापीठात काही काळ प्राध्यापक म्हणून काम करत होती. प्रिन्स्टनच्या फिजिक्स डिपार्टमेंटला सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक असणारी लिसा ही पहिली महिला होती.
डार्क मॅटर आणि डायनासोर हे तिचे अभ्यासाचे खास विषय आहेत.ती जे संशोधन करत असते त्यांचे गुणधर्म आणि पदार्थांच्या अभ्यासाबद्दलच्या माझ्या सध्याच्या ज्ञानात ती रोजच भर घालतेय. तिच्या छान छान मुलाखती नेहमीच येत असतात. त्यात ती जगभरातल्या प्रश्नांना योग्य उत्तरं देत असते. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तिने विविध प्रकारचे मॉडेल विकसित केले आणि त्याचा अभ्यास केला आहे. तिच्या कामात atomic physics चे मानक मॉडेल, सुपरसिमेट्री, बॅरिओगेनेसिस, आणि Dark matter रोजच नवे संशोधन करतेय आणि आता सध्या ती हड्रॉन कॉलिडर आणि dark matter discovery आणि त्याचे मॉडेल यावर मोठ्या प्रमाणात संशोधन करतेय.
लिसाच्या या अफाट अभ्यासामुळे तिला सर्वात फेमस आणि प्रभावशाली theoretical भौतिकशास्त्रज्ञ म्हणून निवडलं गेलंय आणि तिला तिच्या विज्ञान कामांसाठी, प्रयत्नांसाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. अमेरिकन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, द अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, द अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेची सदस्य ,अमेरिकन फिजिकल सोसायटीची सहकारी आणि अल्फ्रेड पी. स्लोअन फाऊंडेशन रिसर्च फेलोशिप, एक नॅशनल विज्ञान फाऊंडेशन यंग इनव्हेस्टिगेटर अवॉर्ड, डीओई बक्षीस कनिष्ठ अन्वेषक पुरस्कार, आणि वेस्टइन्गहाउस सायन्स टॅलेंट सर्च.रँडल रॉयल आयर्लंड अकादमीचे मानद सदस्य आणि ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सचे मानद फेलो आहे ती.
२००३ मध्ये तिला रोम विद्यापीठ, 'ला सॅपियेन्झा' येथून 'प्रेमीओ कॅटेरीना टॉमसोनी ई फेलिस पिट्रो चिसेसी' पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये तिला अमेरिकन व्याख्यानांसाठी अमेरिकन सोसायटी ऑफ फिजिक्स टीचर्स (एएपीटी) कडून क्लोपटेग पुरस्कार मिळाला आणि २००७ मध्ये तिला अमेरिकन कनिष्ठ सोसायटीच्या प्राथमिक भौतिकशास्त्र आणि विश्वविद्यालयावरील कार्यासाठी ज्युलियस लिलिएनफेल्ड पुरस्कार मिळाला.
एवढंच नव्हे तर ती लेखिका म्हणून आजकाल बरीच चर्चेत आहे. Warped Passages, Unraveling the Mysteries of the Universe's Hidden DimensionsandKnocking on Heavens Door अशी अनेक गाजलेली पुस्तकं तिची आहेत.
Knocking on Heaven's Door च्या hardback आणि पेपरबॅकच्या दरम्यान हिग्स बोसॉनचा शोध प्रत्यक्षात पूर्ण झाला आणि पुस्तकात याबद्दल चर्चा करण्यात आली. लार्ज हॅड्रॉन कोलायडरच्या शास्त्रज्ञांनी हिग्स बोसन म्हणून ओळखले जाणारे एक कण शोधुन काढले. असं म्हणतात की ते कण म्हणजे पृथ्वीचा अंश आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांना देवकण (god particle) म्हणून ही ओळखले जाते.
या शोधाबद्दल आसेही सांगितले जाते की, जरी लोक त्याबद्दल सर्व काही समजू शकले नाहीत तरीही फिजिक्समध्ये काहीतरी भारीवालं कांड झालंय म्हणून लोक खुश आहेत. रँडलकडे हिग्स डिस्कवरी: 'द पावर ऑफ एम्प्टी स्पेस' नावाचा ई-पुस्तक आहे. लार्ज हॅड्रॉन कोलाइडर कार्यरत होते त्यापूर्वी, तिने तिला अपेक्षित असणाऱ्या काही गोष्टींचं स्पष्टीकरण देणारा एक लेख लिहिला. एलएचसीने ग्रह नष्ट करणारा ब्लॅक होल बनवता येतो असा चुकीचा विचार तिला सामान्यपणे विचारला होता. यावर तिचं उत्तर भन्नाट होतं. तिने उत्तर दिले की "आपण विचार केला त्यापेक्षा जागा आणि गुरुत्वाकर्षण वेगळे नसल्यास ते अगदी कल्पनीय नसते."
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ती फारच कमी बोलते. शक्यतो टाळते. कदाचित या रातोरात प्रसिद्ध आणि त्याच गतीनं बदनाम होण्याच्या तसंच विस्मृतीत जाण्याच्या काळात तिला फक्त तिच्या कामाच्या माध्यमातुन बोलायला आवडतं असावं. हा गुण तर मी तिच्याकडुन आधी घ्यावा असा आहे. हां ती ही नास्तिक असल्यानं मी तिचे सगळेच गुण घ्यायला हरकत नाही. कारण फिजिक्सबरौबरच देवाबद्दलही आमचे विचार फारसे वेगळे नाही.
एका मुलाखतीत तिला देवावर विश्वास आहे की नाही असं विचारताच ती बोलली,
"... कदाचित मी देवावर विश्वास ठेवणार नाही. मला वाटते की जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना अनैतिक मानलं जातं. हे अर्थातच बरोबर नाही. माझ्या या मतामुळं मला काही शत्रू मिळतील.हरकत नाही. इतर अनेक गोष्टींमध्ये नैतिक असु शकतात ते. तुम्ही धर्मासाठी,धार्मिकतेसाठी फक्त एवढ्याच साठी काही करत असाल की मेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग किंवा नर्क मिळेल तर ते काही योग्य नाही. अगदी सहजतेने,कोणत्याही स्वार्थाविना केलंत तर कदाचित जिवंत असतानाही तुम्हाला याबद्दल योग्य ते पारितोषिक मिळेल."
लिझा,माझी प्रेरणा आणि क्रश तर आहेच पण बऱ्याचअंशी तिला माझं भविष्य बनवावं असं वाटत राहतं. तिच्या त्या शातिर डोक्यानं मी sapiosexually attract तर झालेचै पण उफ्फ!!! तिचं ते अफाट हॉट्ट असणं...!!!!
मार ही डालोगी इकदिन ..!! तर हे माझं शेवटचं लफडं या सिरीजलाही इथंच थांबवतंय. लवकरच परत येईन,इथंच एका नविन सिरीजसह...!
Stay tuned!