पवार अडतिसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा एस.एम जोशी, गणपतराव देशमुख, एन.डी. पाटील, उत्तमराव पाटील यांच्यासारख्या सामाजिक कामे उभी करणाऱ्या तसेच वैचारिक पाया असलेल्या नेत्यांच्या सहवासात ते आले. जयंतरावांनी जशी नेतृत्वाची एक फळी उभी केली, तशीच पवारांनीही ती उभी केली. आता त्यापैकी काही नेत्यांनी त्यांच्याशी गद्दारी केली असली, तरीदेखील अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आणि मुख्य म्हणजे, जयंत पाटील यांच्यासारखे नेते पवारांशी एकनिष्ठ राहिलेले आहेत.