स्वस्त विमानसेवा देणाऱ्या भारतातील ‘गो फर्स्ट’ या नागरी विमान वाहतूक कपंनीनं काही आठवड्यांपूर्वी दिवाळखोरी जाहिर आणि २३ मे पर्यंत एवं तात्पुरती बंद ठेवली असल्याचं जाहीर केलं. या कंपनीच्या विमानांसाठी वापरल्या जाणारी प्रॅट अँड व्हिटनीची इंजिनं खराब दर्जाची निघाल्यामुळं त्यांच्या ताफ्यातील ५० टक्के विमानं उडू शकत नव्हती आणि त्यामुळं त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.