तुम्हाला पंतप्रधान मोदींशी लढायचे आहे, की सावरकरांशी ते ठरवा आणि संभ्रमित होऊ नका, असा सबुरीचा सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शांत करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. परंतु पक्षाचा अध्यक्ष राहिलेला नेता पुन्हा पुन्हा घोडचुका करत असल्यास काय म्हणणार!