पिंपरी-चिंचवडमधून वाहणारी पवना नदी. जलपर्णी, कचरा, प्लॅस्टिकने, दूषित पाण्याने तिचा श्वास कोंडत आहे. रोजचा कचरा, निर्माल्य, हॉटेलमधील उरलेले अन्न असे बरेच काही यामध्ये टाकले जाते. आता तर चक्क मुदत न संपलेली अनेक औषधे, इंजेक्शन इ. नदी पात्रात टाकली गेली आहेत. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.