ऑगस्ट २०१७ मध्ये म्यानमार मधील रखायन प्रांतात तेथील स्थानिक रोहिंग्या लोकांचा नरसंहार केला गेला, या नरसंहारात २५ हजार लोकांची हत्या, हजारो बलात्काराच्या घटना झाल्या, तर लाखो लोकं यादरम्यान जखमी आणि विस्थापित झाली. या विस्थापनात लोकांनी बांगलादेश, भारत, पाकिस्तान, मलेशिया अशा देशांमध्ये शरण घेतलं.