Tejas Mhatre

Indie Journal Dhule Riots

धुळे दंगल प्रकरणी सर्व २१ आरोपी निर्दोष

India
महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात २०१३ साली झालेल्या जातीय दंगलीप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या २१ जणांची जवळपास नऊ वर्षांनी मुंबईच्या सत्र न्यायालयानं कोणत्याही पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
इंडी जर्नल

लखबीरची हत्या करणाऱ्या निहंगानंच त्याला सिंघू सीमेवर नेलं?

India
'द कॅराव्हॅन' आणि 'द इंडियन एक्स्प्रेस' यांनी केलेल्या वार्तांकनानुसार हत्या करणारा निहंग पंथीयच लखबीर सिंघला सिंघू सीमेवर घेऊन गेला होता, ज्यामुळं या घटनेभोवती आता नियोजित षड्यंत्र असल्याच्या शंका उमटू लागल्या आहेत.
indie journal

बीडमध्ये चोरीच्या आरोपातून पारधी कुटुंबावर जमावाचा हल्ला

India
बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील पारनेर या गावात शनिवारी एका पारधी वस्तीवर काही लोकांनी हल्ला केला, या हल्ल्यात १ वर्षीय लहानग्याचा आणि एका ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून, आठ ते दहा लोक जखमी झाले आहेत.
इंडी जर्नल

नवे अहवाल सांगताहेत कोरोनानं उभं केलेलं आर्थिक संकट

India
कोरोनामुळे आपलं जग मूलभूत स्वरूपात बदललं आहे. हे बदल सामाजिक, आर्थिक, तसंच वैज्ञानिक पातळ्यांवर घडल्याचं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे. अनेक विचारवंत आता कोविड आधी आणि कोविड नंतर असा फरक त्यांच्या विश्लेषणात करत आहेत. मात्र काही संशोधकांच्या मते, कोरोनाच्या संकटानं आधीच घडत असणाऱ्या काही प्रक्रियांना वेग देऊन त्यांना तीव्र स्वरूप देण्याचं काम केलं.
Indie Journal

वर्षानुवर्षे संघर्ष पाहिलेल्या व्हेनेझुएलाच्या सरकार-विरोधकांमधल्या वाटाघाटी सामंजस्याचा मार्गावर

Americas
व्हेनेझुएलाच्या सरकार आणि विरोधी पक्षामध्ये मेक्सिको देशात झालेल्या बैठीकीत दोन्ही गटांनी देशातील परिस्थितीचा आढावा घेत चर्चा यशस्वीरित्या पार पाडली आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर एकत्र येऊन काम करणार असल्याचं दोन्ही बाजूंनी स्पष्ट केलं आहे.
Carl de Souza/AFP

ब्राझीलच्या मूलनिवासी लोकांची अस्तित्वासाठी लढाई

Americas
ब्राझील देशाची राजधानी ब्रासिलिआ शहरात गेल्या दोन महिन्यांपासून देशभरातील आदिवासी आंदोलन करत आहेत. ब्राझीलमध्ये येऊ घातलेल्या एका नव्या कायद्याविरुद्ध हे आंदोलन चालू आहे. ब्राझीलच्या संसदेत पारित झालेल्या या विधेयकामुळे देशातल्या मूलनिवासी लोकांचं देशातलं अस्तित्वच धोक्यात येणार आहे. गेले दोन महिने आंदोलनकर्ते आपल्या पारंपरिक वेशभूषेत ते पारंपरिक गीतांच्या चालीतून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष हैर बोल्सोनारो आणि त्यांच्या सरकारला खडेबोल सुनावत आहेत.
Indie Journal

रोजगार हमीसाठी बांधकाम कामगार रस्त्यावर

India
पुण्यातील शेकडो मराठी आणि हिंदी भाषिक बांधकाम कामगारांनी आज कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं. महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या वतीनं रोजगाराचा अधिकार आणि कामगारांच्या नोंदणीकरिता आज हे आंदोलन केलं गेलं.
Four years of Rohingya Crisis

चार वर्षांनंतरही रोहिंग्या देशाविना

Asia
ऑगस्ट २०१७ मध्ये म्यानमार मधील रखायन प्रांतात तेथील स्थानिक रोहिंग्या लोकांचा नरसंहार केला गेला, या नरसंहारात २५ हजार लोकांची हत्या, हजारो बलात्काराच्या घटना झाल्या, तर लाखो लोकं यादरम्यान जखमी आणि विस्थापित झाली. या विस्थापनात लोकांनी बांगलादेश, भारत, पाकिस्तान, मलेशिया अशा देशांमध्ये शरण घेतलं.
The Week

सिलगेरवासियांना नको लष्करी छावणी, आंदोलनाचे १०० दिवस

India
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यातील सिलगेर भागात विविध ठिकाणी गेल्या १०० दिवसांपासून धरणे आंदोलन चालू आहे. ही धरणे आंदोलनं नव्यानं प्रस्तावित असलेल्या सुरक्षा दलांच्या छावणीला विरोध म्हणून केली जात आहेत. स्थानिकांच्या मते ह्या छावण्या आणि तळ त्यांच्या हक्काच्या जमिनीवर बनत आहेत, तसंच अशा छावणीनं आणि सुरक्षा दलांच्या तिथल्या वाढलेल्या वावरानं आदिवासींना दिला जाणारा त्रास वाढू शकतो.
Indian Express

आफ्रिकन नागरिकाच्या मृत्यूनंतर बंगळुरू पोलिसांविरोधात आंदोलन

India
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या आफ्रिकन देशातील नागरिकाचा सोमवारी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना बंगळुरू शहरात घडली. यानंतर शहरातील जे.सी. नगर पोलीस स्थानकाबाहेर या घटनेच्या विरोधात प्रदर्शनं झाली. जमलेले लोक ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ च्या घोषणा देत होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याच्या आधीच पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज करण्यात आला.
indie journal cuba

क्युबामध्ये सरकारविरोधी, सरकार समर्थक दोन्ही गट रस्त्यावर

Americas
क्यूबामध्ये गेल्या काही दिवसांपासून तिथल्या सरकारच्या विरोधात जनता रस्त्यावर येऊन प्रदर्शन करताना दिसत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय वृत्त माध्यमांच्या मते गेल्या रविवारी राजधानी हवाना शहरात झालेल्या प्रदर्शनाला सरकारकडून दडपण्यात आलं, तसंच या आंदोलनांदरम्यान काही लोकांना जेरबंध करण्यात आलं होतं.
The Hindu

सिंहली कट्टरतावादातून श्रीलंकेत मुस्लिमांची होरपळ

Asia
समाज माध्यमांवर काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतील एक व्हिडीओ वायरल झाला होता, ज्यात श्रीलंकेचे काही सैनिक काही मुस्लिम नागरिकांना लॉकडाउनचं उल्लंघन केल्यामुले, गुडघ्यांवर उभं करून हात वर करून शिक्षा करत असताना दिसत आहेत. श्रीलंकन सैन्यानं २० जुन रोजी घडलेल्या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. काही महिन्यांपूर्वीच श्रीलंकेतील मुस्लिमांच्या परिस्थितीवर आणि मुस्लिम विरोधी घटनांवर संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांनी चिंता व्यक्त केली होती.
Indie Journal

युजीसीचे निर्देश, लस मिळाली, आता 'धन्यवाद मोदीजी' म्हणा…

India
विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), जी भारताची सर्वोच्च शिक्षण संस्था आहे, तिने सर्व भारतीय विद्यापीठांना, आयआयटी संस्थांना आणि सर्व कॉलेजना आदेश दिले आहेत की, मोफत लस मोहीमेबद्दल आपल्या संस्थांनामध्ये ”धन्यवाद मोदी जी” असा आशय असलेले बॅनर लावावे आणि ते समाज माध्यमाद्वारेदेखील प्रसारित करावेत.
Politika

ब्राझीलची जनता राष्ट्रपती हैर बोल्सनारो विरोधात रस्त्यावर

Americas
नेहमी वादग्रस्त भाषणं आणि धोरणांमुळे वादात असणारे अति-उजवे पुराणामतवादी ब्राझीलचे राष्ट्रपती हैर बोल्सनारो यांच्या विरोधात काल ब्राझीलच्या शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले होते, "रक्तपिपासू बोल्सनारो खुर्ची सोडा, उपासमार आणि बेरोजगारी वाढवणारं सरकार बाहेर पडा," अशा विविध घोषणा देताना जनता दिसली.
Indie Journal

कट्टरतावादी मौलवी इब्राहिम रैसी इराणचे नवे राष्ट्रपती

Mid West
शुक्रवारी १९ जुने रोजी पार पडलेल्या इराण च्या निवडणुकीत इराणच्या मतदान केलेल्या जनतेने आपला कौल कट्टरतावादी नेते मौलवी इब्राहिम रैसी यांना दिला आहे.
Indie Journal

इराणच्या निवडणुकीत चौरंगी लढत, कट्टरपंथी रैसी यांच्या विजयाची शक्यता

Mid West
शियाबहुल असणाऱ्या इराण देशात आज १८ जून रोजी मतदान पार पडले आहे. ६ कोटी मतदार असणाऱ्या इराण मध्ये राष्ट्रपति स्पर्धेत ४ उमेदवार मैदानात असून पुराणमतवादी नेते इब्राहीम रईसी हे स्पर्धेत पुढे आहेत. इराण ची झालेली आर्थिक अडचण सध्या सर्वात मोठा मुद्दा असून इराणी लोक ह्या निवडणुकीबद्दल आशावादी नसल्याचे चित्र दिसत आहे तसेच कमी मतदानाची शक्यता आहे.
Indie Journal

कोण आहेत पेरूचे नवे राष्ट्राध्यक्ष?

Americas
दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशात पार पडलेल्या निवडणुकीत ‘फ्री पेरू’ समाजवादी पक्षाचे पेद्रो कास्तीयो यांनी जेतेपदावर दावा सांगितला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून पेरूच्या जनतेचं आभार मानत, हे सरकार जनतेला समर्पित राहील असं आश्वासन दिलं.
indie journal

एनडीएची न थांबणारी गळती: भाजपपासून वायले झालेले मित्र पक्ष

India
२०१४ मध्ये पासून आतापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी मधून १९ पक्ष बाहेर पडले आहेत. त्यात राष्ट्रीय तसंच प्रादेशिक छोटे-मोठे पक्ष आहेत. केंद्रीय धोरणांवरून मतभेद, राज्य पातळीवर केंद्राचा वाढता हस्तक्षेप अशा अनेक कारणांवरून प्रादेशिक पक्षांनी भाजपसोबतची युती तोडल्याची अनेक उदाहरणं आहेत.
इब्राहिम गोकचेक

तूर्की सरकारच्या दडपशाहीचा निषेध करताना ग्रुप योरूमच्या आणखी एका सदस्याचं निधन

Europe
तूर्किमधील प्रसिद्ध डाव्या लोकसंगीत गट 'ग्रूप योरुम'च्या दुसऱ्या सदस्याचे आमरण उपोषण दरम्यान मृत्यु झालेले आहे. इब्राहिम गोकचेक हे ३२३ दिवस उपोषणावर होते.
MbS News

२८८ दिवसांच्या उपोषणानंतर तूर्कितील क्रांतिकारक गायिकेचं निधन.

Mid West
तुर्की मध्ये बंदी घालण्यात आलेल्या लोकसंगीत गटाच्या एका सदस्याचे शुक्रवारी उपोषणाच्या २८८ व्या दिवशी निधन झाले आहे. गायिका हेलेन बोलेक आणि गटातील इतर सहकाऱ्यांनी सरकारच्या त्यांच्या प्रती असणाऱ्या वर्तवणुक आणि बंदीचा निषेध करण्यासाठी तुरुंगात असतानाच संप सुरू केला होता.
jair bolsonaro

'माफ करा पण काही लोक तर मरतीलच': ब्राझिलचे राष्ट्रपती बोल्सनारो

Americas
हैर बोलसोनारो २०१८ मध्ये वर्कर्स पक्षाचे फर्नांडो हेडाड यांना हरवून ब्राझीलचे राष्ट्रपती झाले. उजव्या विचारसरणीचे बोल्सनारो नेहमीच आपल्या असंवदेनशील वक्तव्यांमुळे वादात असतात.
Subramanyam Swami

मुंबई विद्यापीठात आयोजित हिंदुत्व आणि झायनवाद कार्यक्रमावरून वाद

India
मुंबई विद्यापीठामध्ये २६ ऑगस्ट रोजी कॉन्सुलेट ऑफ इस्राएल व इंडो-इस्राएल फ्रेंडशिप असोसिएशन द्वारे 'Leaders' Idea of the Nations in the context of Zionism-Hindutva' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
sunil chhetri

मेसीला मागे टाकत सुनील छेत्री बनला जगातला २ऱ्या क्रमांकाचा गोल मेकर

India
अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेसीला मागे टाकत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च गोल करणार सक्रिय फुटबॉलपटू म्हणून स्थान पटकावले आहे.
कोडी

अमेरिकन पत्रकारावर व्हेनेझुएलन सरकारकडून कारवाई

Americas
व्हेनेझुएलास्थित अमेरिकन मुक्त पत्रकाराला आज तिथल्या गुप्तचर यंत्रणेनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशी करुन या पत्रकाराला सोडून देण्यात आलं. मात्र यावरुन अमेरिकन युरोपीय माध्यमांनी व्हेनेझुएलाबद्दल अपप्रचार करणं सुरु केलं आहे.