Americas

'माफ करा पण काही लोक तर मरतीलच': ब्राझिलचे राष्ट्रपती बोल्सनारो

बोल्सनारो नेहमीच आपल्या असंवदेनशील वक्तव्यांमुळे वादात असतात.

Credit : Al Jazeera

हैर बोलसोनारो २०१८ मध्ये वर्कर्स पक्षाचे फर्नांडो हेडाड यांना हरवून ब्राझीलचे राष्ट्रपती झाले. उजव्या विचारसरणीचे बोल्सनारो नेहमीच आपल्या असंवदेनशील वक्तव्यांमुळे वादात असतात.  

“मला माफ करा, काही लोक तर मरणारच हेच आयुष्य आहे, रस्ते अपघातात लोक मृत्यूमुळे पड़तात म्हणून आपण कार कारखाना थांबवू शकत नाही," बोल्सनारो शुक्रवारी रात्री एका मुलाखतीत म्हणाले. तसेच त्यांनी साओ पाउलो शहरातील कोरोना व्हायरसबाधित मृतांच्या अकड्यावर संशय घेत शहराच्या गव्हर्नर ओहाव डोरिया ह्यांच्यावर आरोप करत म्हणाले की, "हा आकडा खूपच जास्त फुगवला जात आहे, आणि मृतांचा अकड्याचा राजकीय फायदा करून घेतला जातोय."  साओ पाउलोचे गव्हर्नर ओहाव डोरिया हे बोल्सनारो माजी सहयोगी होते. २०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ते त्यांचे प्रतिस्पर्धी होण्याची शक्यता आहे. "बोल्सोनारो चुकीची माहिती लोकांना सांगत आहेत दिशभुळ करण्याचा प्रयत्न करत आहेत," असे डोरिया म्हणाले.

"राष्ट्रपतींनी काही मोठे सक्षम निर्णय घ्यायला हवेत, चर्च, रेस्तराँ, लोकल ट्रेन, सर्व काही सुरळीत चालू आहे असे लोक म्हणत आहेत. लोक स्वतःच काळजी घेत घराबाहेर पडत नाही आहेत. रिओ डी जेनेरो शहरातील झोपडपट्ट्या ज्यांना स्थानिक फाबेलो म्हणून ओळखतात व जे गुन्हेगारी, ड्रग्स तस्करी व अन्य गोष्टीमुळे कुप्रसिद्ध आहे, तेथील गुन्हेगार टोळ्यांनी शेवटी स्वतःहूनच बंद पुकारून लोकांना धमकावत लॉकडाऊन घडवून आणला आहे. राष्ट्रपती बोल्सनारो मात्र अजूनही कोरोना विषाणूचे धोके धुडकावत त्याला 'छोटासा फ्ल्यू' म्हणत आहेत. 

या गुन्हेगार टोळ्यांनी स्थानिक पातळीवर थेट धमक्या फिरवल्या आहेत, ज्यात त्यांनी म्हटले आहेत की जर 'सरकार ला आमची काळजी नसेल तर आपणच आपली काळजी घ्यायला हवी, सरकार काही निराकरण करणार नसेल तर आम्हीच ह्याचे निराकरण करू.'

बोलसनारो यांनी याआधी अमेझॉनची आग ही स्थानिक एनजीओ आणि अमेरिकन अॅक्टर लिओनार्दो डी कप्रिओ मुळे लागली असल्याचा दावा केला होता. त्यांनी आता पर्यंत समलैंगिक, मूलनिवासी, महिला  ह्यांच्यावरही द्वेषयुक्त वक्तव्य याआधी केली आहेत.