Priyanka Patil

लोट मायटनर

विज्ञाननायिका: नोबेल समितीने न्याय नाकारलेली लिझ मिटनर

Quick Reads
पहिला अणुबाँब तयार करुन हिरोशिमा-नागासकीला मृत्युचं गाव बनवुन स्वतः मृत्युचा बाप बनलेला ओपेनहायमर. त्याची मी चाहती. पण त्याच क्षेत्रात अविरत काम करणारी लिझ मिटनर, तिला मी एक स्त्री असुनही इग्नोर करते. तो गिल्ट मला कुरडत गेला खुप दिवस. आज तो गिल्ट उतरवायचाच ठरवलंय.
mri curie

विज्ञानायिका: 'उत्सर्जन'शील मरी क्युरी

Quick Reads
शेवटी देश कोणताही असो, स्त्रीला सन्मान देणं हे फारच लाजिरवाणं वाटतं काही लोकांना. ती एवढी यशस्वी होऊनही वैज्ञानिक समूहातील काही पुरुषांनी तिला एक समान मानलं नाही. १९१० मध्ये तिनं फ्रेंच अकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यतेसाठी अर्ज केला आणि दोन मतांनी तिला नाकारण्यात आलं
sophie brahe

विज्ञाननायिका: भावाच्या खांद्याला खांदा लावून संशोधन करणारी सोफी ब्राहे

Quick Reads
सोफीचं नावं खरंतर सोफिया ब्राहे, जिला सोफिया थॉट म्हणून देखील ओळखले जाते. सोफी एक डॅनिश हॉर्टीकल्चर, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र आणि मेडीसीनची विद्यार्थिनी होती. एवढ्या सगळ्या गोष्टी ती शिकली तरी तिची मुळ ओळख ही तिच्या भावाला, टायको ब्राहेला खगोलशास्त्रीय निरीक्षणास मदत करणारी लाडकी बहिण म्हणुनच आहे.
Einstein

विज्ञाननायिका: आईन्स्टाईनच्या प्रसिद्धीमागं झाकोळलेली मिलेव्हा मारिच

Quick Reads
मिलेव्हा मारिच, अल्बुची पहिली बायको आणि त्याआधी प्रेयसी. खरंतर तिची ही 'कुणाची तरी बायको' अशी ओळख बिलकुलच करुन द्यावीशी वाटत नाही, कारण ती जात्याच हुशार आणि बुद्धिमान होती. पण तिला सगळ्यांनीच कुठल्या तरी कोपऱ्यात दडवून टाकलं. ही तिची कथा.
बस्सी

विज्ञाननायिका: लॉरा बास्सी, भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारी पहिली महिला

Quick Reads
आज सर्व माहिती एका क्लिकवर आपल्या हातात हजर असतानाही एक पेपर लिहणं कठिण जातं आणि तेव्हा कोणतीही माहिती सहजासहजी उपलब्ध नसताना लॉराने तिच्या आयुष्यात तिने जवळपास २२८ संशोधनाचे पेपर लिहिले.
Hypatia

हायपेशिया, इतिहासातली कदाचित पहिली हुतात्मा विज्ञाननायिका

Quick Reads
ज्यांच्या पोटी जन्मली तो एक गणितज्ञ होता. Theon of Alexandria. आणि ती म्हणजे थिअॉनचे गुण पुरेपुर गुणसुत्रांमध्ये घेऊन जन्मलेली हायपेशिया अॉफ अलेक्झांड्रिया. नुसतेच गणितज्ञ नव्हते ते. त्याकाळच्या रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या इजिप्तमधील अलेक्झांड्रिया मध्ये रहायची ती. अलेक्झांड्रिया अलेक्झांडरने स्वतःच्या नावानं बनवलेलं शहर. फक्त स्थापत्य कलेचा नमुना म्हणुनच नव्हे तर बुद्धिमत्तेचं शहर म्हणूनही ओळखलं जावं अशी या शहरालाही इच्छा असावी. हायपेशियानं हे सिद्धही केलं.
लिसा रँडल

माझं (शेवटचं) विज्ञानवादी प्रेमप्रकरण: लिसा रँडल

Quick Reads
हार्वर्ड येथे पदवीधर झाल्यानंतर, लिसा २००१ मध्ये हार्वर्डला परत येण्याआधी एमआयटी आणि प्रिन्स्टन विद्यापीठात काही काळ प्राध्यापक म्हणून काम करत होती. प्रिन्स्टनच्या फिजिक्स डिपार्टमेंटला सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक असणारी लिसा ही पहिली महिला होती.
Schroedinger

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: अर्विन श्रोडिंगर

Quick Reads
आम्ही अभ्यासत होतो श्रोडिंगर समीकरणं. तोच तो फेमस मांजरीवाला. जगात जर फिजिक्समध्ये योगदान देणारे कोणते अग्रगण्य देश असतील तर जर्मनी आणि ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रियातील व्हिएन्नामध्येच रुडॉल्फ श्रोडिंगर जे वनस्पतिशास्त्रज्ञ होते आणि जॉर्जिन श्रोडिंगर यांच्यापोटीच १२ ऑगस्ट १८८७ ला जन्मलेला हा अर्विन.
Richard Feynman

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: रिचर्ड फायनमन

Quick Reads
रिचर्ड ना जेवढं वाचत जाऊ तेवढं स्वतःच्या बुद्धिमत्तेनं भुरळ घालतच राहतो. आता बघा ना,जेव्हा मी १५ वर्षाची होते तेव्हा आहे तीच गणितं सुटता सुटत नव्हती. आणि  हा पठ्ठ्या स्वतःच भुमिती,बीजगणित, कॅलक्यूलस शिकत होता.
Maria

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: मारिया गोपर्ट

Quick Reads
एक काळ होता जेव्हा मी आणि सहा वर्षापासुनची रुममेट असणारी पुजी यांना एकएकटं बघणं लोकांना इमॅजिनही होत नव्हतं. ऑल्वेज टुगेदर, बेस्ट फ्रेंड फॉरेवर वगैरे होतो आम्ही. सगळे फ्रेंड्स तर "तुम्ही लेस्बो आहात काय?" असंही गंमतीत म्हणायचे. गेले दोन दिवस प्रिया बापटचा लेस्बियन सीन आला आणि हसायला आलं.
Galileo

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : गॅलिलियो

Quick Reads
गॅली जेव्हा नजरकैदेत होता तेव्हा त्याने  'टू न्यू सायंसेस' लिहिलं. अल्बूनं या पुस्तकाचं भरपुर कौतूक केलं आहे. यामुळंच माझा  गॅली 'आधुनिक भौतिकशास्त्राचे जनक' झाला.
NULL

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : न्यूटन

Quick Reads
फिजिक्स शिकताना ज्याच्याबद्दल प्रचंड राग येऊन वाटतं की सफरचंदाऐवजी सफरचंदाचं झाड पडलं तर बरं झालं असतं . असा हाआयझॅक न्यूटन. महान शास्त्रज्ञ. ज्याचं नाव गली गली का बच्चा जानता है.माझा दोस्त झालेला. का होणार नाही??
होमी भाभा

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: होमी भाभा

Quick Reads
अल्बर्टची स्पेशल थेअरी ऑफ रिलेटिव्हीटी धुमाकुळ घालत होती आणि चारच वर्षांनी इकडं भारतात माझ्या पाचव्या अफेयरने जन्म घेतला होता. लोक त्याला 'भारतीय ओप्पेनहायमर' म्हणत होते. माझ्याच दुसऱ्या आयटमच्या नावानं त्याचं बारसं ही घातलं, पण कधी? ज्यावेळेस तो 'भारतीय न्युक्लीअर सायन्सचा बाप' झाला त्यावेळी.
निकोला

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : निकोला टेस्ला

Quick Reads
निकोला करु लागला काम...केलंही त्यानं...आणि जाऊन पैसे मागितले....त्यावर एडिसन बोलला, "तुला अमेरिकन जोक्स कळत नाहीत...पैसे बिसे काही नाही..जा!"
हायझेनबर्ग

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: हायझेनबर्ग

Quick Reads
५ डिसेंबर १९०१ रोजी वरुर्गबर्ग, जर्मनी, इथल्या माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या ऑगस्ट हाइझेनबर्ग यांच्या घरी हा येडोबा जन्मला. गणित आणि फिजिक्स म्हणजे याचा जीव की प्राण. १९२० मध्ये म्यूनिक येथील मॅक्सिमेलियन शाळेत गेला तेव्हा त्याचं लाईफ टोटली चेंज झालं.
ओपेनहायमार

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: ओपेनहायमर

Quick Reads
माझ्या पोटात गोड गुदगुल्या करणारं आणि अंगभर शहारे आणणारं कातिल हसला होता तो. अजुनही आठवलं की शहारे येतात. माझ्यातला जासुस विजय जागा झाला आणि मी याची पुर्ण माहिती काढायचं ठरवलं. शेवटी काही झालं तरी मॅच्युरिटीवालं प्रेम होतं हे!
आईन्स्टाईन

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : अल्बर्ट

Quick Reads
अख्ख्या वर्गाला, शिक्षकांनाही याची कुणकुण लागली. त्याचा फिजिक्स म्हणून मीही फिजिक्स घेण्यासाठी कॉलेज चेंज केल्यावर नात्यावर शिक्कामोतर्बच झालं. त्यात एका मैत्रिणीने हातावर त्याच्या एका जगप्रसिद्ध निशाणीचा पेननं काढलेला टॅटू बघितलाच. E=mc^2 च्या टॅटूनं माझी आणि अल्बुची प्रेमाकहानी उघड केलीच.