Anannya Kadle

John McDougal

इस्राईल-संयुक्त अरब अमीरात शांतता करार अरब जगतातली उलाढाल

Mid West
अरब देशांमध्ये इस्राईलशी अधिकृतपणे द्विपक्षीय संबंधांना मान्यता देणारा संयुक्त अरब अमीरात हा तिसरा अरब राष्ट्र बनला आहे. १३ ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून इस्राईल व यूएई मधील संबंधांना नवीन आयाम देणाऱ्या डील बद्दल घोषणा केली. ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत शांतता कायम करण्यासाठी हा सौदा एक महत्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल असेल असे म्हणले आहे.
ASSOCIATED PRESS

युरोपच्या शेवटच्या हुकूमशाहीची शेवटची घरघर?

Europe
'युरोपातील शेवटची हुकुमशाही' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलारूसमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात जनआंदोलनं सुरू झाले आहेत. बेलारूसमध्ये ९ ऑगस्ट रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूकीत जवळपास २६ वर्षांपासून सत्तेत असलेले अलेक्झांडर लुकाशेंको पुन्हा निवडून आले आले आहेत. निवडणुका प्रामाणिक व पारदर्शक पद्धतीने न झाल्याची तक्रार करत लुकाशेंकोचे विरोधी उमेदवाराचे समर्थक रस्त्यावर उतरले होते.
AFP

जाणून घ्या अमेरिकन निवडणुकांची कार्यप्रणाली

Americas
येत्या ३ नोव्हेंबर २०२० रोजी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. जगाच्या जुन्या लोकशाही राष्ट्राची अध्यक्षीय निवडणूक सगळ्यात लांबलचक चालणारी प्रक्रिया आहे. दोन महिन्यांवर आलेल्या या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षीय पद्धतीच्या या शासन प्रणालीची निवडणूक कार्यपद्धती थोडक्यात जाणून घेऊया.
महिंदा राजपक्षे ट्विटर

श्रीलंकेत झालेल्या निवडणुकांचं महत्त्व

Asia
नोव्हेंबर २०१९ मध्ये निवडून आलेले श्रीलंकेचे आठवे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी त्यांच्या सरकारमध्ये हंगामी प्रधानमंत्री पदासाठी त्यांचे जेष्ठ बंधू महिंदा राजपक्षे यांची निवड केली. त्यांनी लगेचच मार्च २०२० मध्ये संसद विसर्जित करून सार्वजनिक निवडणुकीची तयारी सुरू केली. २५ वर्षांपासून सुरू असलेले श्रीलंकन गृहयुध्द २००९ साली संपवणारे हेच दोघे राजपक्षे बंधू.
पाकिस्तानने प्रकाशित केलेला नकाशा

पाकिस्तानने प्रकाशित केलेला नव्या राजकीय नकाशात धक्कादायक दावे!

Asia
पाकिस्तान कॅबिनेटने मंगळवारी त्यांचा नवा राजकीय नकाशा जाहीर केला. प्रधानमंत्री इम्रान खान यांनी देशाच्या मीडियाला उद्देशून भाष्य करताना म्हणले आहे की, "हा क्षण पाकिस्तानच्या इतिहासात ऐतिहासिक असा ठरणार आहे. काश्मीरच्या लढाईत प्रस्तुत नकाशा आमची पहिली पायरी आहे."
The New Indian Express

समजून घ्या: भारत-चीन संघर्षाकडे नक्की कसं पाहायचं?

Asia
भारत आणि चीन या आशिया खंडातील दोन मोठ्या बलाढ्य देशांत सीमेवर नव्याने संघर्ष सुरु झाला आहे. ५ मे २०२० पासून दोन्ही देशांत असलेल्या मानलेल्या सीमेवर म्हणजेच LAC वर (ज्याचे अधिकृत सीमांकन झालेले नाही) दोन्ही देशांचे लष्कर, PLA- पीपल्स लिबरेशन आर्मी आणि भारतीय सैन्याचे ITBP इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस समोरासमोर आले आहे.
Daily Sabah

वेस्ट बँकच्या ज्यू वसाहतींना मान्यता देणाऱ्या प्रस्तावित कायद्याला इस्रायली सुप्रीम कोर्टाकडून केराची टोपली

Mid West
इस्राईलच्या सुप्रीम कोर्टाने वेस्ट बँक भागातील बेकायदेशीर इस्राईली ज्यू वस्त्यांना कायदेशीर मान्यता देण्याची वाट मोकळी करून देणाऱ्या, फेब्रुवारी २०१७च्या इस्राईलच्या पार्लमेंटने मंजूर केलेल्या कायद्याला ९ जून रोजी रद्द करून 'असंविधानिक' असा शेरा मारला आहे. या कायद्याचे नाव 'रेग्युलरायझेशन लॉ' असे आहे.
Bloomberg

भारत-चीन संबंधांची किचकट गुंतागुंत समजून घेताना

Asia
दोन राष्ट्रांची सीमारेषा म्हणजे दोन्ही सार्वभौम राष्ट्रांच्या कार्यक्षेत्राच्या वेगळेपणाची आणि स्वातंत्र्याची मर्यादा आखणे. ही सीमा देशांच्या नकाशावर जशी चित्रित केलेली असते तशी भौतिकरीत्या जमिनीवर त्याचे सीमांकन होते. उदा. मॅकमोहन लाईन, रॅडक्लिफ लाईन, दुरान्त लाईन. भारताच्या सीमारेषा जश्या नकाशावर आखलेल्या आहेत तसे त्यांचे सीमांकन झालेले आहे. भारत-चीन सीमारेषेबद्दल वाद या सीमांकनावर आहेत.
The Kootneeti

उसवत चाललेले भारत-नेपाळ संबंध आणि त्यांची पार्श्वभूमी

Asia
नेपाळ हा लहानसा प्रदेश भारताच्या उत्तरी सीमेला लागून आहे परंतु भारताशी नेपाळचे सांस्कृतिक, भाषीय, धार्मिक आणि सभ्यतेच्या दृष्टीने जवळीक पाहता नेपाळवर भारतीय प्रभाव कमी-अधिक परिणाम राहिला आहे.नेपाळ हा पूर्वीच्या 'किंग्डम ऑफ गोरखा' म्हणजेच 'किंग्डम ऑफ नेपाळ' पासून 'फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ नेपाळ' पर्यंतचा प्रवास करताना भयंकर चढउतार, राजकीय उलथापालथ, हिंसा आणि अकस्मात सत्ताबदलांतून गेला आहे.
द अरब वीकली

जॉर्डन व्हॅली-वेस्ट बँकचे विलीनीकरण आणि पॅलेस्टाईन-इस्राईल संबंधांची मोडती घडी

Mid West
पॅलेस्टाईनच्या सार्वभौम राज्याचे स्वप्न आणि इस्राईल-पॅलेस्टाईन यांच्यात शांततामय वाटाघाटी करण्याचे मार्ग आणखी कठीण होऊ शकतात, कारण हे विलीनीकरण पूर्णपणे एकेरी असणार आहे.