पश्चिम आफ्रिकेच्या साहेल प्रदेशातील नायजर या देशात २६ जुलै रोजी लष्करी बंड झालं. १९६० साली फ्रांसकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून नायजरमध्ये लष्करानं केलेलं हे पाचवं बंड असून बझुम नायजरचे लोकशाही पद्धतीनं निवडलेले पहिले राष्ट्राध्यक्ष होते, जे पश्चिमी देशांच्या मर्जीतलेही होते. या बंडाला वॅग्नर ग्रुप, रशिया, फ्रेंच वसाहतवादाचा इतिहास, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, असे बरेच आयाम आहेत.