हे नाटक अशा काळात रंगमंचावर आलं आहे, जिथे सत्य-असत्य, योग्य-अयोग्य या सगळ्याचा जगाला विसर पडू लागल्याचं चित्र आसपासच्या जगात दिसत आहे. जगण्याच्या जाणिवा बोथट होत चालल्या आहेत. अशात एखाद्या कुणाच्या अध्यातमध्यात नसणार्या जोडप्यावर एक कठीण प्रसंग येतो आणि त्यातही त्या जोडप्यातल्या बाईला एक निर्णय घ्यावा लागतो, तेव्हा तिने काय करायला हवं?