राहुल सांकृत्यायन. लेखक, इतिहासकार, पुरातत्ववेत्ता, साम्यवादी विचारवंत,प्रवासवर्णनकार, तत्वान्वेषी, बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक व बहुभाषाविद अशा असंख्य उपाध्या त्यांच्या नावाशी जोडल्या गेलेल्या आहेत. पण ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये असली तरी त्यांना वेगळेपण देणार्या बाबी दुसर्या आहेत. ज्यामुळे ते महान लेखक विचारवंतच नाही तर जनतेचे सांस्कृतिक सेनापती ठरतात.