Americas
सेरेनाचा उद्रेक
लिंगभेद की अखिलाडू वृत्ती?
टेनिस! आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड मोठा चाहता वर्ग असणारा खेळ. त्यामुळे टेनिसचे सामने, जय-पराजय, खेळाडू, खेळाडूंचं खासगी आयुष्य या सगळ्याच गोष्टी कायम चर्चेचा विषय असतात. नुकताच पार पडलेला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना चांगलाच गाजला. जपानच्या नेओमी ओसाका हिने जपानच्या इतिहासातलं पाहिलं 'ग्रँडस्लॅम' पदरात पाडून आपलं नाव सोनेरी अक्षरांनी कोरलं. पण या ऐतिहासिक प्रसंगी ओसकाच्या विजयापेक्षा जास्त चर्चा झाली ती अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या नाट्यमय नाराजीची. भर कोर्टवर सेरेनानं पंचांना खोटारडे आणि 'चोर' संबोधलं. इतकंच नाही तर रॅकेट जोरात टेनिस कोर्टवर आपटलं आणि पराभवानंतर काहीशा नाराजीतच तिनं मनोगत व्यक्त केलं. सेरेनाच्या या कृत्यामुळे महिला एकेरीचा अंतिम सामना चर्चेत राहिला. जपानच्या नेओमी ओसाकाने अमेरिकेच्या या दिग्गज खेळाडूला पराभूत करून पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर केले. महिला टेनिसविश्वात जिचं नाव आदरानं घेतलं जातं त्या सेरेनानं भर कोर्टवर दाखवलेल्या अखिलाडू वृत्तीमुळे, हा सामना होऊन काही दिवस उलटले असले तरी चर्चा मात्र सुरूच आहे.
सेरेनाचे प्रशिक्षक मुरातोग्लू ‘बॉक्स’मधून खुनवून तिला ‘नेटजवळ येऊन खेळ’ असा सल्ला देत होते. त्याकडे सेरेनाचं लक्ष नव्हतं असं म्हटलं गेलं. तरीसुद्धा हा प्रकार लक्षात आल्यावर सामन्याचे पंच कार्लोस रामॉस यांनी सेरेनाला नियमभंगाच्या आरोपाखाली दंड ठोठावला. त्यावर भडकलेल्या सेरेनानं "मी चीटिंग करत नाही, त्यापेक्षा मी हरणं पसंत करेन" असं म्हणत हुज्जत तर घातलीच पण "तू माझ्याशी पंगा घेऊ नकोस, तू खोटारडा आहेस आणि इथुन पुढे तू माझ्या एकाही मॅचला पंच म्हणून राहायचं नाहीस" अशा कटू शब्दात आपला राग सुदधा व्यक्त केला. तिच्या अशा वागण्याची शिक्षा म्हणून पंचांनी ओसाकाला एक पॉईंट दिला. एव्हाना आपण मॅच आणि अर्थातच विजेतेपद देखील हरणार आहोत हे तिच्या लक्षात आल्यावर, दुसऱ्या सेट मध्ये सेरेना प्रचंड संतापली आणि तिनं पंचांना थेट "तुम्ही चोर आणि खोटारडे आहात, इतकंच नाही तर तुम्ही लिंगभेद मानणारे आहात. तुम्ही माझी माफी मागायला हवी" असे बोल ऐकवले. मध्ये तिनं आपलं रॅकेट कोर्टवर आपटून तोडलं. इतकंच काय तर सामना संपल्यानंतर तिनं मुख्य पंच कार्लोस रामॉस यांच्याशी हस्तांदोलन करणं सुद्धा टाळलं. एकाच सामन्यात तिला नियमभंचा दंड, एका गुणाची कपात आणि सामन्यातील मानधनाचा दंड अशा तीन दंडांना सामोरं जावं लागलं. तिच्या वर्तणुकीसाठी टेनिस संघाकडून सेरेनाला जवळपास १७ हजार डॉलर इतका दंडही ठोठावण्यात आला आहे.
गेल्या वर्षी मुलगी 'ऑलम्पिया'च्या जन्मानंतर सेरेना दुसऱ्यांदा ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. अमेरिकन ओपन स्पर्धेत जर सेरेनानं जेतेपद मिळवलं असतं तर, ऑस्ट्रेलियाचे महान टेनिसपटू मार्गरेट कोर्ट यांच्या २४ ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदाशी बरोबरी करण्याची सुवर्ण संधी सेरेनाला होती. सेरेना विल्यम्सला जगभरात एका आदर्शवत व्यक्तीचा मान दिला जातो. तिनं मुल झाल्यानंतर वयाच्या पस्तिशीत सुद्धा जिद्दीनं टेनिस कोर्ट मध्ये उतरून आपली खेळाची छाप कायम ठेवली आहे. या गोष्टीसाठी तिच्यावर अनेकदा कौतुकाचा वर्षाव होतो. लिंगभेद, वर्णभेद अशा सर्व अडथळ्यांवर मात करत तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्वतंत्र ओळख निर्माण केलीये. अशा व्यक्तीकडून अशी वागणुक नक्कीच आक्षेपार्ह वाटते. या टेनिस स्पर्धेदरम्यान झालेल्या सर्व प्रकारावर संमिश्र प्रतिक्रीया बघायला मिळत आहेत. काही ठिकाणी सेरेनाच्या अशा अखिलाडू वृत्तीवर टीका केली जातेय तर काही ठिकाणी तिचं हे वागणं नाहक नव्हतं अस म्हटलं जातंय.
खेळांमध्ये पंचांशी होणाऱ्या खेळाडूंच्या हुज्जती नवीन नाहीत. म्हणूनच सेरेनानं केलेली 'चूक' एखाद्या पुरुष खेळाडूनं केली असती, तर त्यांला सुद्धा अशीच वागणूक मिळाली असती का? असा सवाल देखील केला जातोय. तसंच कोर्टाच्या बाहेर बसून खेळाडूंना सूचना करणारे प्रशिक्षक जवळपास सर्वच लहान-मोठ्या लढतींच्या वेळी दिसून येतात. सेरेनाच्या वेळीच इतकी शिस्त दाखविण्यात अली हे देखील काहींना पचलेलं नाही. सेरेनाच्या प्रशिक्षक पॅट्रिक, संघाला झालेल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले की,''मी तिला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत होतो मात्र तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. ओसाकाचे प्रशिक्षकही तिला मार्गदर्शन करत होते. सगळेच प्रशिक्षक हे करतात" त्यांचा हा मुद्दा कितपत स्विकारहार्य आहे ते संघच ठरवेल.
पंच कार्लोस रॅमोस कडक शिस्तीचे पंच म्हणून ख्यातनाम आहेत. पण बऱ्याच सामन्यांमध्ये प्रशिक्षकांचा हस्तक्षेप हा नियमांचा भंग असला तरी याकडे बहुतेक पंचमंडळी दुर्लक्ष करतात. माजी टेनिस जगज्जेत्या बिली जीन किंग सुद्धा यावेळी सेरेनाच्या समर्थनार्थ धावून आल्या. ‘महिला खेळाडू वाद घालतात, तेव्हा त्या उर्मट आणि उद्दाम असतात, पुरुष खेळाडू मात्र नेहमीच स्पष्टवक्ते किंवा परखड असतात!’ अशा आशयाचं एक उपरोधक ट्विट त्यांनी सामन्यानंतर केलेलं पाहायला मिळालं.
(2/2) When a woman is emotional, she’s “hysterical” and she’s penalized for it. When a man does the same, he’s “outspoken” & and there are no repercussions. Thank you, @serenawilliams, for calling out this double standard. More voices are needed to do the same.
— Billie Jean King (@BillieJeanKing) September 9, 2018
इतरही अनेक आजी-माजी खेळाडूंनी सेरेनाचा संताप अकारण नसल्याचं मत व्यक्त केलं. सेरेनानं कायम तिची योग्यता सिद्ध केली आहे. प्रचंड ताकद, स्टॅमिना आणि जबरदस्त लढाऊ वृत्ती ही तिची ओळख समजली जाते. खेळात सर्वोत्तम असल्याचा सन्मान मिळवण्यासाठी जे लागतं ते सर्व करून ती इथपर्यंत पोहचली. सातत्यानं मिळणाऱ्या या सगळ्या विजयाची साथ लाभल्यानं कायम तिच्या आजूबाजूला एक प्रकारच वलय राहिलंय. असं असलं तरीही भक्कम शरीरयष्टी, चेंडू आला की विचार न करता कसाही धोपटणं, शॉट मारताना जोरात ओरडणं आणि राग या गोष्टी सुदधा सेरेनाला इतरांपेक्षा वेगळं करतात. कोर्टवर संताप दाखवण्याची ही तिची पहिली वेळ नव्हती मात्र नेहमी मिळणाऱ्या यशामुळे बहुतेक तिचं असं वागणं दुर्लक्षित होत गेलं. मागे एकदा सेरेनानं पाय रेषेबाहेर पडल्यावर बॉलगर्लनं हिची चूक निदर्शनास आणून दिल्यावर त्या मुलीसोबत वाद घातला होता. आकांडतांडव करत "तो चेंडू तुझ्या घशात कोंबेन" अशी धमकी सेरेनानं त्या मुलीला दिली होती.
चार दिवसांपासून चालू असलेल्या या चर्चेत एका नव्या मुद्द्यानं मान वर काढलीये आणि तो म्हणजे, व्यंगचित्रकार मार्क नाईट यांनी काढलेलं सेरेनाच्या वर्तनावर भाष्य करणारं खोचक व्यंगचित्र. त्यावर सेरेनाचे चाहते प्रचंड संतापले आहेत. अनेकांनी व्यंगचित्रकार नाईट यांना सोशल मीडियावर जाब विचारला. ऑस्ट्रेलियातील 'हेराल्ड सन' या वृत्तपत्रात सोमवारी नाईट यांनी काढलेलं हे व्यंगचित्र प्रसिद्ध झालं होतं. या व्यंगचित्रात रागात असलेल्या सेरेनाला तुटलेल्या रॅकेटवर उडी मारताना दाखवण्यात आलं होतं. यावेळी सेरेनाच्या चेहऱ्यावर भावना दाखवताना अतिशयोक्ती केल्याचा आणि वंशभेद केल्याचा आरोप तिच्या चाहत्यांनी केला.
Quick drawing of #SerenaWilliams. Needed to get the image of that gross cartoon out of my head. And, huh, a white man can draw her without being racist af. pic.twitter.com/g0b2NugKwD
— John Carter Wolfe (@jcwolfeart) September 11, 2018
This despicable cartoon tried and failed to diminish the greatness & grace of @serenawilliams. Racism in any form is unacceptable. Push On @serenawilliams! #KeepHopeAlive! https://t.co/iNLQNZ4ek7
— Rev Jesse Jackson Sr (@RevJJackson) September 10, 2018
Thanks for explaining exactly why that disgusting cartoon is racist @kelechnekoff . It’s important to take the whole image into account in the context of @serenawilliams continued mistreatment. pic.twitter.com/wRKVo9IF4R
— Tasha's Face (@TashasFace) September 12, 2018दुसरीकडे 'हेराल्ड सन' वृत्तपत्राने बुधवारी पुन्हा एकदा हे व्यंगचित्र नाईट याच्या इतर काही राजकीय व्यंगचित्रांसह ‘वेलकम टू पीसी वर्ल्ड’ या शीर्षकाखाली मुख्य पानावर छापलं. आणि सोबतच म्हटलं की, 'सगळं काही सगळ्यांच्या आवडीनुसार केलं आणि कायम राजकीय दृष्टया संवेदनशील राहिलं तर आपलं जगणं खूपच नीरस होऊन जाईल'. नाईट यांनी त्यांचं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं असून त्यांच्या चित्रात लिंग किंवा वर्णभेद दाखवण्याचा कुठलाच प्रयत्न त्यांनी केला नव्हता अशी भूमिका मांडली. सोशल मीडियावर अनेकांनी नाईट यांना समर्थन करून त्यांच्या व्यंगचित्राचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याची प्रतिक्रिया देखील व्यक्त केली.
Mark Knight's cartoon was legitimate, appropriate commentary on Serena Williams' childish, overbearing tantrum. It was NOT racist. @Knightcartoons is Australia's best cartoonist. We need fearless artists like him poking fun at the powerful for health of our democracy, society.
— NickMcCallum7 (@NickMcCallum7) September 11, 2018
Criticism of Mark Knight's Serena Williams cartoon shows the world has gone too PC & misunderstands the role of news media cartoons and satire. Poor behaviour in any sport needs to be called out. #media #cartoons #markknight @Knightcartoons @theheraldsun https://t.co/KQFuvIJp0Q pic.twitter.com/sRo3AQ1cJW
— Michael Miller (@mm_newscorpaus) September 10, 2018
सामन्यानंतर सेरेना झालेल्या प्रकाराबद्दल बोलताना म्हणाली की, 'मी खेळताना अप्रमाणिकपणा दाखविला नाही. मला जी सजा देण्यात आली तो भेदभाव आहे. मी अनेक पुरुष खेळाडूंना असं वर्तन करताना पाहिलं आहे. हाच सामना दोन पुरुषांमध्ये होत असला असता आणि त्यांनी अंपायरला 'चोर' म्हटलं असतं तर त्यांना मात्र अशी शिक्षा दिली गेली नसती. इथे मी पुरुषांसमान वागणुकीसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी लढले' सेरेनाच्या समर्थकांनी तिला मोठ्या प्रमाणावर साथ दिली असली तरी घडलेल्या प्रकारामुळे ज्या व्यक्तीला आपल्या विजयाचा आनंद सुद्धा नीट साजरा करता आला नाही ती सुद्धा एक 'महिला'च होती याकडे मात्र सर्वांनीच स्पष्टपणे दुर्लक्ष केलं. टेनिस कोर्टवर केलं गेलेलं हे वर्तन कुठल्याच खेळाडूसाठी सन्मानास्पद नाही.
केवळ पंच, सेरेना आणि सेरेनासोबत झालेल्या लिंगभेदाचा निषेध करणारे तिचे समर्थक यांच्या भोवती सर्व चर्चा फिरत असताना खरोखर उत्तम खेळाचे प्रदर्शन करत इतिहास रचणारी ओसाका मात्र दुर्लक्षित राहिली. महिलांचे समान हक्क आणि स्वाभिमानासाठी झगडण्याच्या मोठ-मोठ्या गप्पा होत असतानाच एका स्त्री मुळे दुसऱ्या स्त्रीच्या आनंदावर विरजण पडलंय हा विरोधाभास त्यांच्या लक्षात आला नसावा. दुसरा सेट आणि सामना जिकंल्यावर ओसाकाला रडू कोसळलं कारण सेरेनाच्या चाहते ओसाकावर खुप नाराज झाले होते. 'सेरेनाचे चाहते ती जिंकवी यासाठी तिला प्रोत्साहन देत होते म्हणून मी प्रचंड दबावाखाली खेळत होते. स्टेडियम मधल्या लोकांना ती जिंकवी असं वाटत होतं' अशी भावना ओसाकानं सामन्यानंतर व्यक्त केली. ट्रॉफी वितरणावेळी त्या दोघीही खुप निराश दिसत होत्या.
ओसाकाच्या विजयानं नैसर्गिक आपत्तीला सामोरं जात असणाऱ्या जपान वासीयांच्या दुःखावर फुंकर पडली. लहानपणापासून तिच दैवत मानलेल्या सेरेनाला नमवत अवघ्या विसाव्या वर्षी ओसाकानं आपल्या देशाला पाहिलं वहिलं जेतेपद मिळवून दिलं. पण ऐतिहासिक विजयानं तिला आनंदाऐवजी काहीसं दु:खच झालं असेल. कारण ही स्पर्धा फार चुकीच्या कारणासाठी टेनिसप्रेमींच्या लक्षात राहणार आहे. न्यूयॉर्कच्या आर्थर अॅश स्टेडियममध्ये रंगलेल्या फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सेरेनाला ओसाकाने दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला. याआधी तिनं मार्च महिन्यात झालेल्या 'मायामी ओपन' स्पर्धेत तिच्यावर मात केली होती. सेरेनाला पराजय पचवणं अवघड गेलं म्हणून जर हा सगळा प्रकार घडला असेल तर तो खरच अस्वागत सामन्यानंतर सेरेनानं सावरण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता. सेरेनानं पाणावलेल्या डोळ्यांनी सॉरी म्हणत "या सामन्याचा अंत असा व्हायला नको होता" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली खरी पण सामन्यादरम्यान झालेल्या गोंधळात ओसकाचा विजय काहीसा पडद्याआडच राहिला.