मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्याची मागणी घेऊन १९५० ते १९६० च्या दरम्यान् चळवळ झाली, तिचा आधार फक्त भाषिक विभाजनाचा नव्हता, तर लोकभाषेच्या आधारावर देशाचे राजकीय व्यवस्थापन करण्याचा, म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही राज्याचा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व डाव्या कामगार-शेतकरी नेत्यांकडे होते, हा केवळ योगायोग नाही. समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र हा सर्व जनतेचा ध्येयवाद होता.ती त्यांची स्वातंत्र्य चळवळीतून आलेली आकांक्षा होती.