भारतात देशाचा नागरिक होण्यासंदर्भात कायदा आहे. भारतात जन्म, वारसा, नोंदणी, सातत्यपूर्ण रहिवास आणि एखादा नवीन प्रदेश भारतात समाविष्ट होणे, या आधारे एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व मिळते. ही भारतीय नागरिक होण्यासाठी आवश्यक असणारी मूल्ये आहेत. मात्र, आता हे सरकार नागरीकत्व मिळवण्यासाठी अतिशय मनमानी पद्धतीने नवीन वर्गवारी तयार करत आहे आणि संसदेला निसंशयीपणे या असंवैधानिक विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी विचारत आहे.