प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सदोष तरतुदी आणि अंमलबजावणी मुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई पासून वंचित ठेवून हजारो कोटी रुपये मलिदा विमा कंपन्या हडप करीत आहेत. हे प्रमाण अत्यंत भयावह आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यामागे एक कोटी रुपये विमा कंपन्या मिळवीत आहेत.