रक्षाबंधनावरून PETA ने केलेल्या ट्विट वरून ह्या वादाची सुरवात झाली. १६ जुलैच्या ह्या ट्विटचा संदर्भ होता, रक्षाबंधन आणि त्यानिमित्ताने कातडीसाठी गायिंवर होणारे अत्याचार. गुजरातेतल्या काही शहरांत टांगलेल्या ह्या फलकांवरून थोड्याच वेळात तुंबळ युद्ध पेटले, आणि सोशल मीडियावरील नामांकित हिंदुत्ववादी मंडळींनी मोठ्या हिरीरीने ह्यात भाग घेतला.