Emmanuel Vincent Sander

quentin2

टॅरेंटिनोमय : प्रभावी लेखन, आयकॉनिक पात्रं आणि हिंसेचा उत्सव

Quick Reads
‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’मध्ये वेअरहाऊसमधल्या एका प्रसंगात एका सदस्याला गोळी लागते, आणि लगेच त्यावर उपचार करण्याची काही सोय नसते. आधी त्याला त्या रक्तातळलेल्या अवस्थेत पाहवलं जात नाही. पण मग नंतर जेव्हा तो लिटरली रक्ताच्या थारोळ्यात झोपतो तेव्हा ते फारच कृत्रिम नि अतिरेकी वाटतं. परिणामी विनोदी वाटतं. कमालीच्या गांभीर्यातून (किंवा कमालीच्या हिंसेतून) कमालीचा विनोद करणं टॅरेंटिनोला फारच चांगलं जमतं.