सोनाझारिया मिंझ ह्या कुलगुरू म्हणून नियुक्त झाल्यानंतर फेसबुक व इतर सामाजिक माध्यमांवर वर्षानुवर्षे दडपलेल्या समूहातून एक स्त्री संषर्ष करत आपली शैक्षणिक वाटचाल करते या बद्दल अभिनंदनास नक्कीच पात्र ठरत असते. मात्र हे होत असतांना या घटनेत अनेक परिवर्तनाच्या/बदलाच्या क्रांतिकारी शक्यता शोधले जाण्याच्या आणि त्याव्दारे एकूणच कुलगुरू पदाबद्दलच स्तोम आणि भ्रम वाढवले जाण्याचा जो धोका आहे त्याबाबत सतर्क राहावे लागेल असेच वाटते.