मी वाचतो, तीच घरातली पुस्तकं त्यानंही वाचली. त्यानंही त्याचे हस्तमैथूनापासून क्युबापर्यंतच्या कित्येक शंकांचं समाधान त्यानं माझ्याचकडून करूनही घेतलं होतं. प्रतिगांधीनं लोकपालसाठी जंतरमंतरवर देशाचं पर्यावरण धुरकट करायला घेतलं, तेव्हा तो म्हणाला, ‘समर्थनासाठी मोर्चा काढतोय, तू मिटिंगला यावंस.’