डाव्या प्रागतिक राजकीय आघाड्या राष्ट्रराज्य व सार्वभौमात्व ह्या भूमिका उजव्या विचारसरणीने व्यापल्यामुळे, व आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या समस्येचा अर्थ न समजून घेता, त्या भूमिकेचा ताबा सोडून जागतिकीकरणाच्या बाजूने एका उच्च नैतिकतेची भूमिका घेताना दिसत आहेत. परिणामतः जो श्रम कामगार, शेतकरी व गरीबांचा वर्ग अंतरराष्ट्रीय वित्तीय भांडवलाच्या जागतीकीकरणाच्या रेट्यात भरडला गेला आहे तो बऱ्याच अंशी उजव्या विचारांकडे वळत आहे.