खरं तर मी मोठा झालो ते ‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का आणि धनुष्यबाणावरच मारा शिक्का’ या आणि अशा घोषणा देतच. त्यावेळी मुंबईच्या ‘चुनाभट्टी’ भागात आम्ही राहत होतो. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाचा दबदबा असलेला हा सारा भाग. माझ्या शालेय वयात मी कोणत्याही सामाजिक - राजकीय घडामोडींमध्ये रूढार्थानं सहभागी नव्हतो.