भारतानं टी-२० विश्वचषक स्वतःच्या नावे करून जवळपास १३ वर्षांचा विश्वचषकांचा दुष्काळ संपवला. अर्थात ही आनंदाची गोष्ट असली, तरी त्यानंतर देशभर पाहायला मिळालेला उत्सव एक वेगळीच कहाणी सांगत आहे. हे जे ओसंडून वाहत आहे, त्याच्या झगमगीत आवरणाच्या मागे त्या कोणत्या भावना आहेत ज्या लपून राहत आहेत? आणि या प्रश्नाचा उलगडा करण्याचाच निमित्ताने, २७ नोव्हेंबर २००९ आणि ५ डिसेंबर २००९ रोजी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांचे लोकसत्ता या दैनिकात प्रकाशित झालेले दोन लेख एकत्र करून प्रकाशित करत आहोत.